नवी दिल्ली : भारतातील आघाडीचे शॉर्ट-फॉर्मेट व्हिडिओ ॲप मित्रोंने भारतीयांना मनोरंजन देण्याचे यशस्वी एक वर्ष पूर्ण केले. मित्रों नागरिकांना शॉर्ट व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांची प्रतिभा दाखवण्याची, मते व अभिप्राय शेअर करण्याची सुविधा देतो. एक वर्षाच्या कालावधीमध्ये मित्रों टीव्हीला गुगल प्ले स्टोअरवर ५० दशलक्षहून अधिक डाऊनलोड्सचा प्रतिसाद मिळाला आहे.
एक वर्षाच्या यशस्वी प्रवासासह ॲपने व्यासपीठावर मित्रों क्लब, मित्रों अकॅडमी आणि मित्रों ऑन-डिमांड हे नवीन उपक्रम आणत प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. हे नवीन उपक्रम क्रिएटर्स व युजर्सदरम्यान सहभाग व उत्साह निर्माण करण्यामध्ये मदत करतात.
मित्रों टीव्हीच्या सूक्ष्म-उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी बांधील राहत मित्रों क्लब सेवा ऑफरिंगच्या माध्यमातून शॉर्ट-फॉर्मेट व्हिडिओ ॲप उत्पन्न प्राप्त करून देण्याच्या व्यवसायामध्ये प्रवेश करत आहे. तसेच क्लबच्या माध्यमातून ॲप क्रिएटर्सना विशेषत: सेवेचा अवलंब करणाऱ्या युजर्ससाठी सर्वसमावेशक कन्टेन्ट निर्माण करण्याची अद्वितीय संधी देते.
याव्यतिरिक्त क्लबचे सदस्य त्यांच्या आवडत्या क्रिएटर्ससोबत थेट संलग्न होऊ शकतात आणि त्यांना पाहावेसे वाटणाऱ्या कन्टेन्टची निर्मिती करण्याची विनंती करू शकतात. म्हणून, व्यासपीठ निर्मात्यांना व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत कन्टेन्ट निर्माण करण्यास आणि त्यांच्या प्रतिभेच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करण्यास पाठिंबा देण्यासोबत प्रोत्साहित करते.
मित्रों टीव्ही त्यांच्या युजर्ससाठी मित्रों अकॅडमी व मित्रों ऑन-डिमांड हे दोन आणखी अद्वितीय उपक्रम देखील सादर करत आहे. मित्रों अकॅडमीच्या माध्यमातून क्रिएटर्सना शैक्षणिक व्हिडिओज शेअर करण्याची संधी मिळते, ज्यामुळे युजर्सना व्यासपीठावरून शिकण्यास मदत होते. तसेच मित्रों ऑन-डिमांडच्या माध्यमातून युजर्स ऑन-डिमांड कन्टेन्टसाठी विनंती करू शकतील, जसे ज्योतिष वाचन, समर्पित गाणी, टिप्स व हॅक्स, वाढदिवस शुभेच्छा.
मित्रों टीव्हीने त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये देखील सुधारणा केली आहे. त्यांचा युजर्स व क्रिएटर्सना अनुकूल इंटरफेस देण्याचा मनसुबा आहे. ॲपने तंत्रज्ञानक्षम उपक्रम सादर केले आहेत, जे युजर इंटरफेस सुधारण्यामध्ये मदत करतील.
ते पुढे म्हणाले, ”मित्रों लक्षवेधक व वैविध्यपूर्ण कन्टेन्टसाठी ओळखले जाते आणि इन्फोटेन्मेंट व एज्युटेन्मेंटवर मुख्य फोकस आहे. देशामध्ये शॉर्ट-फॉर्मेट कन्टेन्ट झपाट्याने वाढत असताना आमचा भारतीयांशी संलग्न होण्याचा आणि त्यांना मनोरंजनापलीकडील आनंद देणारे व्यासपीठ देण्याचा दृष्टिकोन आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये व्यासपीठावर १०० दशलक्ष (एकूण) युजर्सची भर करण्याचा आमचा संकल्प आहे.”
एक वर्षाच्या प्रवासाबाबत सांगताना मित्रों टीव्हीचे सीटीओ व सह-संस्थापक श्री. अनिश खंडेलवाल म्हणाले, ”मागील एक वर्ष आमच्यासाठी रोलर कोस्टर राइड राहिले आहे. आम्ही प्रेमाचा भरघोस वर्षाव केलेल्या भारतीय प्रेक्षकवर्गाचे मनापासून आभार मानतो. मित्रोंने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. आम्ही तंत्रज्ञान सुधारणांपासून आमच्या व्यासपीठावर विविध वैशिष्ट्यांची भर करण्यापर्यंत सर्वसमावेशक राहिलो आहोत. मित्रों टीव्हीच्या युजर्सनी ॲपवर अधिक वेळ व्यतित करण्यास सुरूवात केली आहे आणि प्रतियुजर सरासरी सत्र कालावधी अंदाजे १० मिनिटे आहे. एक वर्ष पूर्ण केल्यानंतर आम्ही आता उत्पन्न प्राप्त करून देण्याच्या व्यवसायामध्ये प्रवेश करत आहोत. या व्यवसायाच्या माध्यमातून आमचा आमच्या निर्मात्यांना असे व्यासपीठ देण्याचा मनसुबा आहे, जो त्यांना त्यांच्या प्रतिभेच्या माध्यमातून कमावण्याची आणि उद्योजक बनण्याची संधी देईल. आम्ही प्रत्येक भारतीय घरामध्ये मित्रोंला घेऊन जाण्याचा आणि प्रेक्षकांसोबत सखोल संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.”
मित्रों टीव्ही झपाट्याने भारतभरातील उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रों टीव्हीने व्यासपीठावर अधिक निर्माते, युजर्स व कन्टेन्ट भागीदारांची भर करण्याचे ध्येय स्थापित केले आहे. ॲप भारतीय प्रेक्षकाला भारतीय सर्विसेसवर प्रबळ सुरक्षित डेटासह स्वदेशी ॲप्सची सेवा दिली पाहिजे या विश्वासाशी बांधील आहे.






