Animation Day : ॲनिमेशन कधीपासून सुरू झाले? बारावीनंतर उत्तम करिअर पर्याय, आणि पगार 'इतका' आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दरवर्षी 28 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. ॲनिमेशन हा प्रकार सुरुवातीला व्यावसायिक रंगभूमीवर सुरू झाला, परंतु आता तो थ्रीडी आणि स्पेशल इफेक्ट्ससह मोठ्या पडद्यावर पोहोचला आहे. आजही काही लोक ॲनिमेशनला फक्त कार्टूनच मानतात, परंतु व्यंगचित्र ही ॲनिमेशनची फक्त एक छोटी शाखा आहे. या दिवशी ॲनिमेशनचा सन्मान केला जातो आणि ॲनिमेशनच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.
आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिनाची सुरुवात 2002 साली आंतरराष्ट्रीय ॲनिमेटेड फिल्म असोसिएशनने (Association Internationale du Film d’Animation) केली होती. 28 ऑक्टोबर हा दिवस निवडण्यामागे कारण असे आहे की, याच दिवशी, 1892 साली चार्ल्स-एमिल रेनॉड यांनी पॅरिसमधील ग्रेविन म्युझियममध्ये पहिल्या ॲनिमेटेड चित्रपटाचे प्रक्षेपण केले होते. त्यावेळी “पँटोमाइम्स ल्युमिनस” हा त्यांचा कार्यक्रम होता, ज्यात ‘पौव्रे पिएरोट’, ‘अन बॉक’, आणि ‘ले क्लाउन एट सेस चियन्स’ या तीन चित्रपटांचा समावेश होता. यानंतर 1895 मध्ये ल्युमिएर बंधूंच्या सिनेमॅटोग्राफने या तंत्रज्ञानाला मागे टाकले, पण रेनॉड यांच्या या प्रयोगाने मनोरंजन क्षेत्रात ऐतिहासिक योगदान दिले.
Animation Day : ॲनिमेशन कधीपासून सुरू झाले? बारावीनंतर उत्तम करिअर पर्याय, आणि पगार ‘इतका’ आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ॲनिमेशन क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी आहे. आजकाल ॲनिमेशनची मागणी चित्रपट, जाहिराती, गेम्स आणि वेब सिरीजमध्ये वाढत चालली आहे. ॲनिमेशन क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम ते तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बारावीनंतर थ्रीडी ॲनिमेशन सर्टिफिकेट, सीजी आर्ट्स, टूडी सर्टिफिकेट, ‘एडिटिंग, मिक्सिंग आणि पोस्ट प्रोडक्शन वर्क्स’ आणि व्हीएफएक्स यांसारखे अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत, जे 3 ते 6 महिन्यांत पूर्ण करता येतात. याशिवाय, बीएससी इन ॲनिमेशन, बीए इन ॲनिमेशन आणि ग्राफिक डिझाईन, बी.डेस. इन ॲनिमेशन आणि डिजिटल फिल्ममेकिंग अशा अनेक पदवी अभ्यासक्रमांमध्येही शिक्षण घेता येते.
हे देखील वाचा : World Day of Audiovisual heritage, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि थीम
नोकरीच्या संधींचा विचार करता, ॲनिमेशन क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी कंपन्या फ्रीलान्स किंवा पूर्णवेळ ॲनिमेटरची नियुक्ती करतात. ॲनिमेशनमध्ये क्रिएटिव्हिटी आणि तंत्रज्ञानाची समज असलेल्या व्यक्तींना या क्षेत्रात चांगले करिअर करता येते. ॲनिमेटर, टेक्सचर आर्टिस्ट, गेम डिझायनर, 3D/2D ॲनिमेटर, इमेज एडिटर, लाइटिंग आर्टिस्ट, की फ्रेम ॲनिमेटर, स्पेशल इफेक्ट्स आर्टिस्ट अशा विविध भूमिका यात उपलब्ध आहेत, ज्यात सुरुवातीला 40,000 ते 55,000 रुपये पगार मिळू शकतो.
हे देखील वाचा : किती मोठा विध्वंस करू शकते ‘दाना’ चक्रीवादळ? जाणून घ्या कशी तयार होतात ही वादळे
आज आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन साजरा करण्यामागचा उद्देश ॲनिमेशनच्या माध्यमातून मनोरंजन आणि कला क्षेत्रात होणाऱ्या बदलांविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आहे. यानिमेशन क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे आणि यामुळे मनोरंजन क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत आहेत.