बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार! पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँका ठप्प
यूएफबीयूचे कन्व्हेनर व बँक ऑफ महाराष्ट्रचे कॉ. राजेंद्र देवळे यांनी सूत्रसंचालन केले. एनसीबीचे ललित निकुंभ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे बँक कर्मचारी व अधिकारी शारीरिक व मानसिक तणावाखाली आहेत. सुमारे ८२ टक्के कर्मचारी-अधिकाऱ्यांना वर्क-लाईफ बॅलन्स नसल्यामुळे आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
यानंतर आयबॉकचे कॉ. सतीश घुगे यांनी परदेशात चार दिवसांच्या आठवड्याबाबत चर्चा सुरू असताना भारतात पाच दिवसांच्या आठवड्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. नोबोचे बैंक ऑफ महाराष्ट्रचे अजय बोरसे व बैंक ऑफ बडोदाचे रवींद्र सुतवणे यांनी पाच दिवसांचा आठवडा आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित राहण्याचे आवाहन केले. यावेळी एसबीआयचे कॉ. राहुल साळुंखे, एमजीबीच्या कॉ. राजश्री वरुडकर, एनसीबीच्या एसबीआयच्या स्वाती चव्हाण तसेच एआयबीओएचे कों, निलेश खरात यांनी घोषणाबाजी करत सभेला पाठिंबा दिला.
प्रमुख मार्गदर्शन कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी केले. हा लढा कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी असून आत्तापर्यंत प्रत्येक संघर्षात बँक कर्मचाऱ्यांनी यश मिळवले आहे. या आंदोलनातही यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील टप्प्यात दोन दिवस, तीन दिवस किंवा बेमुदत संपाचा निर्णय शीर्ष नेतृत्व घेईल व त्याची अमलबजावणी कर्मचारी पूर्ण ताकदीने करतील, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात अंदाजे ५०० ते ६०० कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा समारोप पंजाब नॅशनल बँकेचे कॉ. प्रणव कौशिके यांच्या आभार प्रदर्शनाने व जोरदार घोषणाबाजीने झाला.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे आदेश; तृतीयपंथीयांच्या तक्रारी सोडवा आणि तातडीने ओळखपत्रे द्या!






