छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानची तीन बोटे कापली (फोटो - टीम नवराष्ट्र)
छत्रपती शिवाजी यांनी स्वराज्यासाठी प्राण पणाला लावून अनेक लढाई केल्या. शत्रूसोबत कधी शक्ती तर कधी युक्तीने लढत देत स्वराज्यनिर्मिती केली. यामध्ये पुण्यातील लाल किल्ल्यावर झालेल्या शाहिस्ताखावरील हलल्याचा आवर्जुन उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहिस्ता खान यांच्यातील लढाई मराठा इतिहासातील अत्यंत धाडसी घटना मानली जाते. १६६३ साली शाहिस्ता खान पुण्यातील लाल महाल येथे मुक्कामाला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी गुप्तपणे हल्ला करण्याची योजना आखली. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी लग्नसमारंभाच्या वेशात शहरात प्रवेश केला आणि अचानक लाल महालावर धाड टाकली. या अचानक हल्ल्यामुळे मुघल सैन्य गोंधळले. या चकमकीत शाहिस्ता खानाचा हात जखमी झाला आणि त्याची तीन बोटे कापली गेली. या घटनेनंतर शाहिस्ता खानाने घाबरून पुणे सोडले. ही लढाई शिवाजी महाराजांच्या चातुर्य, धाडस आणि युद्धनीतीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. (Dinvishesh)
05 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
05 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
05 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






