डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १ एप्रिल १९९० रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. ना भारतरत्न हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि दलितांच्या हक्कांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी सामाजिक समता, शिक्षण आणि न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अस्पृश्यता, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध त्यांनी आवाज उठवून समाजात परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना स्वाभिमान आणि अधिकारांची जाणीव करून दिली. भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी मोलाची भूमिका बजावत लोकशाहीच्या मूल्यांना बळकटी दिली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न हा सन्मान बहाल करण्यात आला. (Dinvishesh)
01 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
01 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
01 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






