मुघल साम्राज्याचा इतिहासाचा साक्षीदार शहाजहानने बांधलेला लाल किल्ला बांधण्यास सुरुवात झाली (फोटो - सोशल मीडिया)
दिल्लीतील लाल किल्ला हा भारताच्या समृद्ध इतिहासाचा एक साक्षीदार मानला जातो. लाल किल्ल्याने मुघलशाहीपासून स्वतंत्र भारताचा इतिहास पाहिला आहे. शाहजहान याने इ.स. 1638 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती. सुमारे 10 वर्षांच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या या भव्य किल्ल्याचे काम इ.स. 1648 मध्ये पूर्ण झाले. लाल वाळूच्या दगडांपासून तयार झाल्यामुळे याला ‘लाल किल्ला’ हे नाव देण्यात आले.
मुघल साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या या किल्ल्यात दिवान-ए-आम, दिवान-ए-खास, रंग महल यांसारख्या आकर्षक वास्तूंचा समावेश आहे. 1857 चा स्वातंत्र्यसंग्राम दरम्यान या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पुढे भारताचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते येथे ध्वजारोहण केले जाते. इतिहास, वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम असलेला लाल किल्ला आजही पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरतो. (Dinvishesh)
13 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
13 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
13 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






