गुंतवणूकदारांचा विश्वास जपणाऱ्या SEBI ची स्थापना करण्यात आली (फोटो - टीम नवराष्ट्र )
भारतातील भांडवली बाजाराच्या पारदर्शकतेसाठी आणि गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला 1988 मध्ये एक प्रशासकीय संस्था म्हणून याची सुरुवात झाली, मात्र 1992 मध्ये संसदेमार्फत कायदेशीर दर्जा देण्यात आला. SEBI चे मुख्य उद्दिष्ट शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे, फसवणूक रोखणे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवणे हे आहे. दलाल, म्युच्युअल फंड, क्रेडिट रेटिंग संस्था यांसारख्या बाजारातील घटकांवर देखरेख ठेवण्याचे काम SEBI करते. गेल्या काही वर्षांत SEBI ने अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा राबवत डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार अधिक मजबूत आणि विश्वासार्ह बनला आहे. आज SEBI ही देशाच्या आर्थिक व्यवस्थेतील एक महत्त्वाची आणि विश्वासार्ह नियामक संस्था म्हणून ओळखली जाते. (Dinvishesh)
12 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
12 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
12 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष
1720 : बाळाजी विश्वनाथ भट – तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1662)
1817 : ‘चार्ल्स मेसिअर’ – फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 26 जून 1730)
1906 : महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1836)
1912 : कारा बार्टन – अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1821)
1945 : ‘फ्रँकलिन डी. रुझवेल्ट’ – अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 30 जानेवारी 1882)
2001 : ‘देवांग मेहता’ – NASSCOM चे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1960)
2001 : ‘हार्वे बॉल’ – स्माईली चे जनक यांचे निधन. (जन्म: 10 जुलै 1921)
2001 : हिंदकेसरी पै. चंबा मुत्नाळ यांचे निधन.
2006 : ‘राजकुमार’ – कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1929)






