आज पवन ऊर्जा केवळ वीज निर्मितीसाठीचा एक पर्याय न राहता, तो आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि ऊर्जा स्वावलंबनाचा एक स्तंभ ठरत आहे. विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागात पवन प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगारात वाढ होत असून, ऊर्जा स्वयंपूर्णता साध्य होण्यास मदत होते.
२०२५ मध्ये वारा दिनाची थीम
दरवर्षी या दिवसासाठी एक विशिष्ट थीम जाहीर केली जाते, मात्र २०२५ साठी अधिकृत थीम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही, यंदाही याचे मुख्य उद्दिष्ट लोकांमध्ये पवन ऊर्जेबाबत जागरूकता वाढवणे, हवामान बदलाला थोपवणे आणि अक्षय ऊर्जेच्या दिशेने समाजाला प्रवृत्त करणे हेच राहणार आहे.
वारा दिनाचे साजरे करण्याचे मार्ग
जागतिक वारा दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक उपक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित केली जातात. विविध संस्था आणि शाळा मुलांमध्ये पवन ऊर्जेची माहिती पोहोचवण्यासाठी पवन चक्क्यांचे मॉडेल, पोस्टर स्पर्धा, माहितीपट प्रदर्शन अशा उपक्रमांचे आयोजन करतात. सामाजिक माध्यमांवर देखील #GlobalWindDay, #WindEnergy अशा हॅशटॅग्सच्या माध्यमातून जागरूकता वाढवली जाते. काही ठिकाणी पतंग स्पर्धा, पवन प्रेरित कला प्रदर्शन, स्थानिक पातळीवरील चर्चा सत्र यांचेही आयोजन होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलकडे ‘Iron Dome’ ही ताकत असतानाही इराणने कसा केला संरक्षण मुख्यालयावर थेट क्षेपणास्त्र हल्ला?
भारताचा सहभाग आणि भविष्याची दिशा
भारताने देखील पवन ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र हे राज्य पवन ऊर्जा निर्मितीमध्ये आघाडीवर आहेत. केंद्र सरकारने देखील 2030 पर्यंत 500 GW अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठरवले आहे, त्यात पवन ऊर्जेचा मोठा वाटा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video : इस्रायलच्या हवाई हल्ल्याने इराणचे आकाश रिकामे; जागतिक उड्डाणे मार्ग बदलू लागली
वाऱ्याची दिशा बदलतेय – स्वच्छ ऊर्जेकडे
जागतिक वारा दिन हे फक्त एक औपचारिक आयोजन नसून, भविष्यातील ऊर्जेच्या सुरक्षिततेसाठीचा जागरूकतेचा संकल्प आहे. आजचा दिवस आपण वाऱ्याच्या शक्तीला मान्यता देऊन, स्वच्छ, हरित आणि टिकाऊ पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे टाकतो. पवन ऊर्जेमुळे येणाऱ्या नव्या शक्यता, संधी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने, ‘जागतिक वारा दिन’ म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर एक परिवर्तनाची सुरुवात आहे.