जीएसटी
भारतामध्ये सगळीकडे जीएसटी लागू करण्यात आली आहे. जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर. दरवर्षी भारतामध्ये १ जुलैला भारतीय जीएसटी दिवस साजरा केला जातो. केंद्र सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या कर सुविधेच्या अंमलबजावणीसाठी GST दिवस साजरा केला जातो.भारतासारख्या मोठ्या देशात सगळ्यात आधी 1 जुलै 2017 रोजी जीएसटी कर लागू करण्यात आला होता. त्यानंतर हा कर सगळीकडे लागू करण्यात आला. जीएसटी कर लागू केल्यानंतर पहिल्याच वर्षी भारतीय कर दात्यांना या प्रणालीला चांगला प्रतिसाद दिल्याने 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.(फोटो सौजन्य-istock)
जीएसटी म्हणजे केंद्र सरकारद्वारे वस्तू आणि सेवांवर एकत्रपणे आकारण्यात आलेला कर. केंद्रीय GST आणि राज्य GST असे दोन कर आकारले जातात. GST परिषदेने तयार केलेल्या महसूल वितरणामध्ये GST महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. उत्पादन शुल्क, VAT, सेवा कर, इ. वस्तू आणि सेवा कर कायद्याला संसदेमध्ये 29 मार्च 2017ला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 1 जुलै 2017 रोजी देशभरात सगळीकडे जीएसटी कर लागू करण्यात आला. लागू करण्यात आलेला जीएसटी कर संपूर्ण देशासाठी एकच देशांतर्गत अप्रत्यक्ष कर कायदा आहे.
भारतामधील व्यवसाय नोंदणीकृत व्यक्ती आणि भारतामध्ये व्यवसाय चालवणाऱ्या कोणत्याही परदेशी संस्था यांना जीएसटी करणे भरणे बंधनकारक आहे. तुमचा व्यवसाय जर नोंदणीकृत व्यवसाय असेल, तर जीएसटी भरणे आवश्यक आहे. जीएसटी कर भरण्यासाठी अर्जदाराला नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पंधरा अंकी क्रमांक दिलेला असतो.
‘एक राष्ट्र, एक कर’ ही विचारधारा साध्य करण्यासाठी भारतामध्ये जीएसटी कर लागू करण्यात आला. जीएसटी करचा फायदा म्हणजे प्रत्येक राज्य विशिष्ट उत्पादन किंवा सेवेसाठी समान दराचे पालन करते. केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे अचूक पालन केले जाते. सामानाच्या वाहतुकीसाठी ई-वे बिले आणि व्यवहार अहवालासाठी ई-इनव्हॉइसिंगसारखे सामान्य कायदे लागू केले जाऊ शकतात.






