• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Independence Day 2024 78 Years Of Independence What Has India Gained And What Has It Lost Nrhp

Independence day 2024: स्वातंत्र्याची 78 वर्षे; भारताने काय कमावलं अन काय गमावलं?

देश आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे. फाळणीनंतर भारताला युद्ध, दहशतवादी हल्ले, दुष्काळ, आणीबाणीपासून ते कोरोना महामारीपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण आजही देश तितक्याच ताकदीने आणि भक्कमपणे पुढे जात आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 15, 2024 | 09:39 AM
Independence day 2024: स्वातंत्र्याची ७८ वर्षे भारताने काय कमावलं अन काय गमावलं? दिन

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे पूर्ण झाली. या वर्षांत भारताने जगभर नाव कमावले. भारताच्या नावावर अनेक उत्कृष्ट कामगिऱ्यांची नोंद झाली. विकासाच्या बाबतीतही भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्याबरोबरच इंग्रजांनी आपली फाळणीही केली. यानंतर देशाला युद्ध, दहशतवादी हल्ले, दुष्काळ, आणीबाणीपासून ते कोरोना महामारीपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण आजही भारत भक्कमपणे पुढे जात आहे. या 77 वर्षांत आपल्या आयुष्यात काय बदल घडले आहेत? भारत देशाने या 77 वर्षात नक्की काय प्रगती केली आणि कुठे विकास होऊ शकला नाही ते जाणून घ्या.

भारताची अर्थव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली आहे हे जाणून घेऊया?

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा जीडीपी 2.7 लाख कोटी रुपये होता आणि तो जागतिक जीडीपीच्या तीन टक्क्यांपेक्षा कमी होता. आज 2024 मध्ये देशाच्या जीडीपीचे सध्याचे मूल्य अंदाजे 272.41 लाख कोटी रुपये झाले आहे. भारताचा साक्षरता दर 1947 मध्ये सुमारे 12 टक्के होता आणि आज तो 74 टक्क्यांवर पोहोचला आहे. जर आपण 1960 ते 2021 या कालावधीतील जीडीपी वाढ पाहिली तर 1966 पूर्वी जीडीपी सरासरी चार टक्के दराने वाढला होता. 2015 पासून जीडीपी वाढीचा दर सतत सहा टक्क्यांहून अधिक आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा GDP 6.5 ते 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

असे बदल अर्थव्यवस्थेत होत असतात

1947 ते 1980 पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ नऊ टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत होती. म्हणजे त्यात अनेक वेळा चढ-उतार आले.

1981 ते 1991 या काळात विकास दर एकदा शून्याच्या खाली पोहोचला होता. सर्वाधिक नऊ टक्के वाढ नोंदवली गेली.

1992 ते 2019 पर्यंत अर्थव्यवस्थेचा विकास दर चार ते आठ टक्क्यांच्या दरम्यान राहिला. या काळात भारताची अर्थव्यवस्था स्थिर आणि मजबूत झाली.

2023-24 या वर्षात सध्याच्या किमतींनुसार देशाचा GDP 295.35 लाख कोटी असण्याचा अंदाज आहे.

हे देखील वाचा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार जनतेला संबोधित; 6 हजारपेक्षा जास्त पाहुणे राहणार उपस्थित

महागाईत मोठी तफावत होती

एकीकडे देशाने स्वातंत्र्यानंतर खूप विकास केला आहे, तर दुसरीकडे महागाईनेही कळस गाठला आहे. खाद्यपदार्थांपासून ते सोने, पेट्रोल-डिझेल, सोने सर्वच महाग झाले. दैनंदिन गोष्टींमध्ये किती बदल झाला आहे ते जाणून घेऊया?

वस्तू/पदार्थ                 1947 मध्ये किंमत किती होती?                               आता किंमत किती आहे?

  1. सोने (10 ग्रॅम)                    रु 88.62 (10 ग्रॅम)                                               72,430  रु
  2. पेट्रोल (एक लिटर)              27 पैसे                                                                 103.44  रु
  3. तांदूळ (प्रति किलो)             12 पैसे                                                                  40.16   रु
  4. साखर (प्रति किलो)             40 पैसे                                                                44.78    रु
  5. बटाटे (प्रति किलो)              25 पैसे                                                                 37.12    रु
  6. दूध (एक लिटर)                  12 पैसे                                                                 59.12    रु
Independence day 2024: स्वातंत्र्याची ७८ वर्षे भारताने काय कमावलं अन काय गमावलं? दिन

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

गरिबांची संख्याही कमी झाली

स्वातंत्र्याच्या वेळी देशातील 70 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती. स्वातंत्र्यानंतर त्यात बरेच बदल झाले. 1977 पर्यंत ही संख्या 63% पर्यंत घसरली, 1991 पर्यंत 50% लोकसंख्या गरीब होती. 2011 च्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील 22.5 टक्के लोक गरिबीत जगत आहेत. UN च्या अलीकडील आकडेवारीनुसार, 15 वर्षांच्या कालावधीत (2005-06 ते 2019-21) भारतात 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. अहवालात असे दिसून आले आहे की 2005-2006 ते 2019-2021 या काळात देशातील 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. 2005-2006 मध्ये गरिबांची लोकसंख्या 55.1 टक्के होती, ती 2019-2021 मध्ये 16.4 टक्के झाली.

आंतरराष्ट्रीय व्यापारात आपण किती पुढे आलो आहोत?

1950-51 मध्ये, भारताने $1.27 अब्ज डॉलरची आयात केली आणि $1.26 अब्ज निर्यात केली.

1975-76 मध्ये $6.08 अब्ज आयात आणि $4.66 अब्ज निर्यात.

1990-91 मध्ये, 24 अब्ज डॉलर्सची आयात आणि 18 अब्ज डॉलरची निर्यात झाली.

2002-03 मध्ये $50 अब्ज आयात आणि $44 अब्ज निर्यात.

2023-24 या आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात US$ 776.68 अब्ज आणि आयात US$ 854.80 अब्ज इतकी असल्याचा अंदाज आहे.

Web Title: Independence day 2024 78 years of independence what has india gained and what has it lost nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 09:04 AM

Topics:  

  • Independence Day
  • india

संबंधित बातम्या

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
1

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
2

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० नोव्हेंबरपासून ही सेवा होणार बंद
3

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० नोव्हेंबरपासून ही सेवा होणार बंद

BJP RK Singh Suspension : NDA च्या विजयानंतर भाजप सरकारचा मोठा निर्णय, आरके सिंग यांना पक्षातून केले निलंबित
4

BJP RK Singh Suspension : NDA च्या विजयानंतर भाजप सरकारचा मोठा निर्णय, आरके सिंग यांना पक्षातून केले निलंबित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांचा घरकाम करणारा 284 कोटींचा मालक, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान किती श्रीमंत?

Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांचा घरकाम करणारा 284 कोटींचा मालक, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान किती श्रीमंत?

Nov 17, 2025 | 05:33 PM
शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली Dharmendraयांची भेट, हेमा मालिनींच्या चेहऱ्यावर दिसली चिंता

शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली Dharmendraयांची भेट, हेमा मालिनींच्या चेहऱ्यावर दिसली चिंता

Nov 17, 2025 | 05:33 PM
Delhi Blast News: दिल्ली स्फोटात दहशतवादी उमर नबीने वापरला ‘शू बॉम्बर’ आणि TATP स्फोटक; NIA च्या तपासात खळबळजनक खुलासा

Delhi Blast News: दिल्ली स्फोटात दहशतवादी उमर नबीने वापरला ‘शू बॉम्बर’ आणि TATP स्फोटक; NIA च्या तपासात खळबळजनक खुलासा

Nov 17, 2025 | 05:28 PM
‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…

‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…

Nov 17, 2025 | 05:27 PM
”तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस..” प्रविण तरडेंनी केली कानउघडणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाले….

”तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस..” प्रविण तरडेंनी केली कानउघडणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाले….

Nov 17, 2025 | 05:14 PM
पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

Nov 17, 2025 | 04:53 PM
IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले

IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले

Nov 17, 2025 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.