File Photo : Independence Day
नवी दिल्ली : भारताचा आज 78 वा स्वातंत्र्यदिन असल्याने राजधानी दिल्लीसह देशभरातील विविध भागांत आज अनेक देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यातच दिल्लीत स्वातंत्र्यदिनी 11 श्रेणीतील असे एकूण 18 हजार पाहुणे आजच्या दिवशी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली जात आहे. हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील.
हेदेखील वाचा : Independence Day 2024 Wishes: स्वातंत्र्यदिन आणखीन खास बनवण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘या’ खास देशभक्तीपर शुभेच्छा
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील विशेष बाब म्हणजे यापैकी 6 हजार विशेष पाहुणे महिला, शेतकरी, तरुण आणि गरीब वर्गातील असतील. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला विकासाचा संदेश देणार असून, 2047 पर्यंत देशाचा विकास करण्याचे त्यांचे व्हिजन जनतेसमोर मांडणार आहेत. यावेळी लाल किल्ला संकुलात होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी 11 श्रेणीतील 18 हजार पाहुणे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.
यामध्ये ‘अटल इनोव्हेशन मिशन’ आणि पीएम श्री (प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया) योजनेचा लाभ घेतलेले विद्यार्थी आणि ‘मेरी माती मेरा देश’ अंतर्गत मेरा युवा भारत आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.
पंतप्रधान मोदींना सलामी
पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर त्यांना व्यासपीठावर नेले जाईल. तत्पूर्वी त्यांना सलामी दिली जाणार आहे. पंतप्रधानांच्या ‘गार्ड ऑफ ऑनर’ तुकडीमध्ये लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांचा प्रत्येकी एक अधिकारी आणि 24 जवानांचा समावेश असेल, अशीही माहिती दिली जात आहे.
हेदेखील वाचा : Independence Day: देशातील मुख्यमंत्र्यांना कसा मिळाला झेंडावंदन करण्याचा अधिकार? जाणून घ्या इतिहास