भारतीय सैन्य आपली ताकद दाखवून पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्याना मारले होते. 29 सप्टेंबर रोजी भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकने सर्वांना धक्का दिला होता. (फोटो - सोशल मीडिया)
भारतीय सैन्यासाठी 29 सप्टेंबर हा एक अविस्मरणीय दिवस आहे. आजच्या दिवशी भारताच्या शूर सैनिकांनी पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचे धाडस केले. भारताच्या या नव्या धाडसी पाऊलाचा साक्षीदार म्हणून आजच्या दिवसाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी आहे. भारताने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडल्याचा दावा केला असला तरी पाकिस्तानने अशी कोणतीही कारवाई नाकारली.
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले. भारतीय लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला मानला जात होता. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्याचे श्रेय सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवाद्यांना देण्यात आले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने अवघ्या काही दिवसांत प्रतिहल्ला केला. 29 सप्टेंबर रोजी पाकिस्तानवर भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने पाकिस्तानची आणि दहशदवाद्यांची झोप उडवली होती. या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे नवीन भारताचे आक्रमक पवित्रा दिसून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील भारत सरकार दहशवाद्यांचे भ्याड हल्ले सहन करणार नाही. जवानांच्या प्राणांच्या आहुतीचा बदला हा हल्ला करुन केला जाईल असा संदेश ‘सर्जिकल स्ट्राईक’ मधून शेजारील खुरापती करणाऱ्या देशांना देण्यात आला. त्याचबरोबर जागतिक राजकारणामध्ये देखील घरात घुसून दहशदवाद्यांना मारण्याच्या भारताच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’ मधून भारताबद्दल इतर देशांमध्ये मजबूत असा संदेश दिला गेला.
मागील वर्षी 29 सप्टेंबर रोजी महिलांबाबत देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. 29 सप्टेंबर 2023 रोजीच्या कायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेत महिला आरक्षणाबाबत नमूद करण्यात आले. 28 सप्टेंबर रोजी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या तरतुदीसह महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींनी मान्यता दिली. त्यानंतर 2023 या विधेयकांचे रुपांतर कायद्यामध्ये झाले. त्यामुळे देशातील स्त्रियांना राजकीय क्षेत्रात ठोस भूमिका मांडण्याची आणि देशाच्या जडणघडणीमध्ये हातभार लावण्याची संधी मिळाली.
इतिहासातांच्या पानांमध्ये 29 सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या काही इतर घटना –
याचे मूळ आर्टिकल वाचण्यासाठी आपण https://navbharatlive.com/ यावर क्लिक करावे