फोटो सौजन्य - Social Media
भारतात वक्फ बोर्डाच्या बदलीसंदर्भात चर्चेला उधाण आले आहे. सांगितले जात आहे कि, लवकरच भारत सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात बदल घडवून आणणार आहे, त्याविषयी नवीन कायदाही येण्याची चर्चा होत आहे. सुंत्रानुसार, आता स्त्रियांचाही वक्फ बोर्डात समावेश करून घेतला जाणार आहे तसेच वक्फ संपत्तीना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे स्वतःला रजिस्टर करून घेणे गरजेचे आहे. भारतात वक्फच्या मुद्द्यांवरून अनेक वाद पाहिले गेले आहे. ताजमहाल वक्फची संपत्ती आहे कि नाही? वादांपैकी एक महत्वाचं मुद्दा आहे. भारतातील अनेक संपत्ती वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येते, परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कि वक्फ बोर्ड नक्की काय आहे? तर जाणून घेऊया वक्फ बर्ड आणि त्यामागचा इतिहास.
वक्फ या शब्दचा उगम वाकूफा या अरबी शब्दपासून झाला आहे. या शब्दाचा अर्थ म्हणजे जण कल्याणाच्या उद्दिष्टाने दान केलेली संपत्ती असते. ही संपत्ती फक्त जमीनच नव्हे तर कोणत्याही प्रकारची वस्तू असू शकते. वक्फला दान करणारा दाता म्हणजे वकिफ असतो. मोहम्मद पैगंबर यांनी गरिबांना मदतीचा हात म्हणून ६०० खजुराची झाडे असलेली बाग दान केली होती. या दान केलेल्या संपत्तीला इस्लाम धर्मामध्ये पहिली वक्फ संपत्ती म्हंटली जाते. भारतातील अनेक मशिदी वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येतात. दिल्ली सल्तनतच्या राज्यात वक्फ संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. त्याकाळी बहुतेक संपत्ती बादशाहची असल्याने येथे वकिफ म्हणून त्या काळच्या बादशाहला म्हंटले जाईल.
भारतात १९५४ साली, वक्फ ऍक्ट लागू करण्यात आला होता. त्याचवेळी वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. वक्फ बोर्डच्या नियंत्रणाखाली देशातील सगळ्या वक्फ संपत्ती येतात. यानंतर १९५५ साली या कायद्यात नवीन बदल करण्यात आले तर २०१३ मध्ये याविषयावर संशोधन करण्यात आले. आताची व्यवस्था पूर्णपणे याच कायद्याच्याआधारे सुरु आहे. वक्फ संपत्तीमार्फत मिळालेल्या दानातून शैक्षणिक संस्था, मशिदी, कब्रिस्तान आणि आश्रम बनवले जातात. या बोर्डात महिल्यांना स्थान मिळवून देण्यासाठी तसेच अन्य काही मुद्यांसाठी या कायद्यात काही बदल करण्यात येणार आहेत.