National Education Day : कोण होते मौलाना अबुल कलाम आझाद? ज्यांच्या जयंतीला साजरा केला जातो राष्ट्रीय शिक्षण दिन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
National Education Day : दरवर्षी भारत ११ नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि आधुनिक भारताच्या शिक्षणव्यवस्थेचे रचनाकार मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी २००८ साली राष्ट्रीय शिक्षण दिनाची घोषणा करण्यात आली होती.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवून आणली. त्यांनी १९४७ ते १९५८ च्या काळात शिक्षणमंत्री म्हणून कार्य केले. आपल्या काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण शिक्षणसंस्था स्थापन केल्या. यामध्ये त्यांनी विश्वविद्यालय अनुदान आयोग (UGC)ची, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), साहित्य अकादमी, आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR)ची स्थापना केली.
कलाम यांनी शिक्षण केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून ते सामाजिक, समानता आणि वैज्ञानिक दृष्टीतोनाचे, सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक असल्याचे म्हटले. याचे महत्व त्यांनी लोकांना पटवून दिले. त्यांना देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत गुणवत्तपूर्ण शिक्षण पोहचवण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी प्रयत्न देकील केले. त्यांच्या विश्वास होता की, शिक्षण हे स्वातंत्र्याचे आणि प्रगतीचे लक्षण आहे. आजही भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब दिसून येते.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या मते, शिक्षण समाजात क्रांती घडवून आणते. याचा उद्देश केवळ उपजिविकेचे साधन उभारणे नसून विचार करण्याची क्षमता विकसित करणे आहे. त्यांच्या या विचारांना समर्थन आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आपण राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करतो.
आजचा हा राष्ट्रीय शिक्षण दिन या महान नेत्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठीच नव्हे, तर देशातील शिक्षण प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आहे. आजच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी शिक्षण क्षेत्रात समान संधी आणि गुणवत्तापूर्वक शिक्षणाची गरज अधोरेखित करणे, तसेच डिजिटल लर्निंग, संशोधन आणि नवी कल्पनांना प्रोत्साहन देणे आहे. तसेच शिक्षक आमि विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरुक करणे आहे.
यंदा राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या जगात मानवी स्वातंत्र्य जपणे आहे.यातून माणसाला तंत्रज्ञानाचे महत्त्व समजवणे पण यासोबतच त्याचा योग्य वापर करण्याची आणि मानवी मूल्ले आणि विचार जपण्याचा प्रयत्न करणे हा याचा उद्देश आहे. आजच्या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी यानिमित्त शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजने करण्यात आले आहे.
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा






