फोटो सौजन्य- pinterest
भारताने सार्वभौम प्रजासत्ताक बनण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले तेव्हा आपली राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आपले हक्क, कर्तव्य आणि एकात्मतेची जाणीव करून देतो. या दिवशी आपण आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या महानवीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या शक्ती, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या महानतेचे प्रतीक आहे.
26 जानेवारी रोजी भारत आपला राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन आहे. यावेळी राज्यघटनेच्या अंमलबजावणीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आणखीनच खास असणार आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वादविवाद, भाषण, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने उत्साहाने सहभागी व्हावे. शाळेत भाषण देण्यापूर्वी, घरी सराव करणे केव्हाही चांगले. भाषणात सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्राचार्य व शिक्षकांना अभिवादन केले. 26 जानेवारी रोजी देश आपला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे असे सांगून सुरुवात करूया. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. या कारणास्तव, दरवर्षी 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
सर्व शिक्षकांना, माझ्या प्रिय मित्रांना आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.…आज आपण 26 जानेवारी रोजी भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचे स्मरण करण्यासाठी येथे जमलो आहोत. हा दिवस आपल्या देशासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण या दिवशी भारताने स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून स्वतःची स्थापना केली. हा दिवस आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देतो आणि आपल्याला एक नवीन दिशा आणि प्रेरणा देतो.
जर तुम्हाला झोप लागत नसेल तर घरामध्ये असेल ही मोठी समस्या
26 जानेवारी 1950 ला भारताच्या संविधनाला संविधान सभेत पास करण्यात आले होते. या दिवसानंतर प्रतिवर्ष भारतीय 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतात. भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते की, “आपल्या महान आणि विशाल देशाचे अधिकार या एका संविधानात सामावलेले आहेत. हे संविधान देशातील सर्व पुरुष आणि महिलांच्या कल्याणाची जबाबदारी घेत आहे.
‘प्रजासत्ताक’ हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. ‘प्रजा’ अर्थात जनता व ‘सत्ताक’ म्हणजे सत्ता. याचा अर्थ होतो प्रजेद्वारे निवडलेली सत्ता. जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा पश्चिमेकडील देशांनी यावर टीका करीत म्हटले की, भारतात कधीही “लोकशाही” यशस्वी होणार नाही. ते असे मानत असत की भारतीयांना गुलामगिरीची सवय झालेली आहे. परंतु त्यांना अजिबात कल्पना नव्हती की एकेकाळी विश्वगुरु असलेला भारत व भारतीय एकजूट होऊन कुठलेही कार्य पार पाडू शकतात. एवढेच नव्हे, संपूर्ण जगाला आपल्या समोर नतमस्तक देखील करू शकतात आणि याचाच परिणाम आहे की आज 76 वर्षानंतरही आपला देश प्रजासत्ताक आहे व आपला देश आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो.
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व केवळ संविधानाच्या अंमलबजावणीपुरते मर्यादित नाही तर हा दिवस आपल्याला आपल्या देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देतो ज्यांनी आपल्या संघर्ष आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला देशाच्या सेवेत पूर्ण निष्ठा, त्याग आणि कर्तव्याचा धडा शिकवला. या महान वीरांनी आपल्याला हे समजावून सांगितले की स्वातंत्र्य हा केवळ अधिकार नाही तर एक जबाबदारी देखील आहे.