(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच चर्चेत असते. या शोमधील अनेक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे ओंकार भोजने. ‘अगं अगं आई…’ असो किंवा ‘साइन कॉस थिटा’ ओंकारने अनेक भूमिकाकरून स्किट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि त्यांच्या मनात घर केलं आहे. कोकण कोहिनूर ही ओळख त्याला हास्यजत्रेमुळे मिळाली. तसेच जेव्हा जेव्हा तो स्किट्समध्ये दिसला आहे तेव्हा ते गाजलं आहे.
तसेच नुकत्याच मधल्या काळात ओंकारने अचानक हास्यजत्रा सोडली आणि त्याच्या चाहत्यांना ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. परंतु आता त्याच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांना नाराज करणारा ओंकार भोजने पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये परतला आहे. ओंकार भोजनेची महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये घरवापसी झाली आहे. ओंकारने शूटींगलाही सुरुवात केली आहे. ओंकार भोजने पुन्हा एकदा हास्यजत्रेच्या मंचावर त्याची जादू पसरवणार आहे. आणि ‘अगं अगं आई…’ पुन्हा नवा प्रवास सुरु करणार आहे.
मधल्या काळात ओंकार भोजनेनं महाराष्ट्राची हास्यजत्रेचा निरोप घेतला तेव्हा तो चित्रपटांमध्ये दिसला. दरम्यान त्याने झी मराठीवरील फू बाई फूच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री घेतली होती. पण तो शो काही महिन्यातच बंद पडला. त्यानंतर ओंकार भोजनेनं थेट कलर्स मराठीवरील हसताय ना हसायलाच पाहिजे या कॉमेडी शोमध्ये एन्ट्री घेतली. पण दुर्दैवानं हा शो देखील काही महिन्यात बंद झाला. तसेच ओंकार व्यावसायिक नाटक देखील करत होता आणि त्या नाटकाला आणि त्याच्या पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.
‘गैरसमज निर्माण झाले…’, अरिजीत सिंगसोबतच्या भांडणावर सलमान खानने अखेर सोडले मौन; म्हणाला…
आता काही काळ विश्रांती घेतल्यानंतर ओंकार पुन्हा हास्यजत्रेत परत येत आहे. ओंकारला पुन्हा हास्यजत्रेत पाहायचं आहे अशी मागणी अनेक महिने चाहते सोशल मीडियावर करत होते. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. ओंकारने नुकतीच शोच्या शूटींगला सुरुवात केली असून तो लवकरच नव्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या दिवाळीत हास्याचा डबल डोस मिळणार आहे. यंदाच्या दिवाळीत टेलिव्हिजनवर विनोदाचे फटाके फुटणार आहेत. ‘कोकण कोहिनूर’ ओंकार भोजनेच्या घरवापसीमुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची वेगळीच रंगत पाहायला मिळणार आहे. त्याला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.