महाराष्ट्रातील समाजसुधारक देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबाई हळबे यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
इंदिराबाई हळबे यांनी मावशी हळबे म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान मिळवले आहे. त्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध समाजसेविका होत्या, ज्यांनी १९५४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे ‘मातृमंदिर’ नावाची संस्था स्थापन केली. प्रतिकूल परिस्थितीतही स्वबळावर समाजात कार्य उभ्या करणाऱ्या हळबे मावशींच्या जीवनावर ‘देवरुखच्या सावित्रीबाई’ हे पुस्तक अभिजित हेगशेट्ये यांनी लिहिले आहे. अनेक वैयक्तिक धक्क्यांमधून सावरत त्यांनी सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. कोकणातील एका गावातून त्यांनी स्वतःच्या आत्मबळावर एक उत्तुंग कार्य उभे केले. आजच्या दिवशी 1998 साली त्यांना देवाज्ञा झाली. पण कोकणातील मदर तेरेसा म्हणून ओळख मिळवलेल्या इंदिराबाईंना कोणीही विसरलेले नाही.
08 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
08 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
08 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष