फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मतदान हा प्रत्येक लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ही प्रक्रीया अधिक प्रगत झाली आहे. मतदान पद्धीतंमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. पूर्वी मतदानासाठी केवळ बॅलेट पेपर, म्हणजेच कागदी मतपत्रिकांचा वापर होत असे. मात्र आता, तंत्रज्ञानाच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) भारतीय निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. दोन्ही पद्धतींमध्ये वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत. एक लोकशाही देशाचे नागरिक म्हणून आपल्याला या दोन्ही पद्धतींमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. आज आपण या लेखात बॅलेट पेपर आणि ईव्हिएम मशीन यांच्यीतल फरक आणि फायदे-तोटे जाणून घेणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊयात बॅलेट पेपर आणि इलेक्ट्रॉनिक पद्धीतमध्ये काय फरक आहे.
बॅलेट पेपर: पारंपरिक पद्धत
बॅलेट पेपर पद्धतीत मतदारांना मतपत्रिका दिली जाते. या मतपत्रिकेमध्ये उमेदवारांच्या नावांची आणि पक्षांच्या चिन्हांची यादी असते. नागरिक आवडीच्या उमेदवारासमोर खूण करतात आणि नंतर ती दुमडून सुरक्षित मतपेटीत टाकतात. मग यामतपत्रिकेद्वारे मत नोंदवले जाते.
या पद्धीतीमध्ये मतदाराला स्वत:च्या मताची खात्री मिळते कारण त्याने ते प्रत्यक्षात लिहून दिलेले असते. याशिवाय प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी ही सोयीची ठरते. या मतपत्रिकेमुळे फेरमोजणी करणे शक्य होते. परंतु, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक आहे. या पद्धतीमुळे मत मोजण्यास जास्त वेळ लागतो आणि मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब होतो.
ईव्हीएम- प्रगत तंत्रज्ञानाची पद्धत
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मतदान प्रक्रियेला जलद आणि अचूक बनवतात. मतदाराने निवडलेल्या उमेदवारासमोरील बटण दाबल्यावर त्याचे मत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात लगेच नोंदवले जाते.
ईव्हीएममुळे मतमोजणीचे काम सोपे आणि वेगवान होते. तसेच यामुळे मानवी चुका टाळता येतात. एकदा यंत्रे खरेदी केल्यानंतर छपाई खर्च आणि कर्मचाऱ्यांची गरज कमी होऊन ही पद्धत दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते. मात्र, ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. कारण या तांत्रिक मशिनसोबत छेडछाड होण्याची शक्यता असू शकते असे अनेकांचे मत आहे. तसेच, काही लोकांना तांत्रिक ज्ञान नाही अशा मतदारांना ईव्हीएमचा वापर कधीकधी अवघड वाटतो. यामुळे काही जण मतदानापासून वंचित राहू शकतात.
आपण विचार केला तर दोन्ही पद्धतींचे आपले फायदे आणि तोटे आहेत. बॅलेट पेपर प्रक्रिया पारंपरिक आणि पारदर्शक वाटते, पण वेळखाऊ आहे. तर दुसरीकडे, ईव्हीएम प्रक्रिया वेगवान आहे; मात्र, त्याच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. अशा परिस्थितीत लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असते. तसेच एक लोकशाही देशाचे नागरिक म्हणून देखील जबाबदारी असते की आपण याबाबत जागरूक राहिले पाहिजे.
हे देखील वाचा- किटकांवर निर्भर असलेला लहानसा खादाड ‘योद्धा’ कोळी; निसर्गाचा कीटकनाशक