गेल्या सात दशकांपासून प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या विश्वासाचा एक भाग असलेली व्हीको लॅबोरेटरीज आता आपल्या दोन प्रमुख उत्पादनांसाठी, व्हीको टर्मरिक स्किन क्रीम आणि व्हीको वज्रदंती आयुर्वेदिक पेस्ट या दोन नव्या ब्रँड कॅम्पेनसह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून व्हीकोने परंपरेचा सन्मान राखत तरुण पिढीशी अधिक प्रभावी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
या कॅम्पेनमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अनुभवी कलाकार रेवती यांना एकत्र आणण्यात आले आहे. कथेप्रमाणे आलिया भट्ट तिच्या जुन्या टूथपेस्टपासून ‘ब्रेकअप’ करते आणि असे उत्पादन निवडते जे खरंच हिरड्यांची काळजी घेते. व्हीको वज्रदंतीमध्ये २० पेक्षा अधिक आयुर्वेदिक वनस्पती असून, हिरड्यांमधुन होणारे रक्तस्राव, सूज आणि कमकुवतपणा यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपाय देते. रेवती यांची उपस्थिती विशेषतः दक्षिण भारतीय प्रेक्षकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरते. हा कॅम्पेन विको वज्रदंतीला केवळ टूथपेस्ट न मानता संपूर्ण आयुर्वेदिक देखभाल म्हणून सादर करतो.
या दुसऱ्या कॅम्पेनमध्ये अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची ऑन-स्क्रीन मुलगी सुहानी सेठी यांच्यातील संवाद आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आयुर्वेदिक ज्ञानाच्या प्रवासाची झलक दर्शवतो. रवीना येथे एक पारंपरिक पण समजूतदार आईची भूमिका साकारते, तर सुहानी ही आधुनिक, आत्मनिर्भर तरुणी असून तिला त्वचेच्या सौंदर्याइतकीच तिच्या आरोग्याचीही काळजी आहे.
हा कॅम्पेन स्पष्ट करतो की आयुर्वेद हा केवळ जुना विचार नसून, आजच्या जगातही तो तितकाच उपयुक्त आहे. व्हीकोचे हे दोन्ही कॅम्पेन आयुर्वेदाला आधुनिक काळातील उपयुक्त उपचार पद्धत म्हणून मांडतात. ७० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव, नैसर्गिक घटकांवरील विश्वास आणि ग्राहकांशी नात्याची जपणूक व्हीकोला आजही लोकप्रिय ब्रँड बनवते. व्हीको ही आयुर्वेदिक उत्पादनांची आघाडीची भारतीय कंपनी असून, पारंपरिक औषधी वनस्पतींना आधुनिक विज्ञानाशी एकत्र करून प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ग्राहकांना पुरवते.