अभिषेक शर्मा (फोटो - सोशल मीडिया)
आज अभिषेक शर्माकडे हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. आज अभिषेक शर्मा हार्दिक पंड्याचा सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड मोडू शकतो. तसेच इंग्लंडविरुद्ध टी 20 मध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडण्याची संधी अभिषेक शर्माकडे असणार आहे.
आजच्या सामन्यात अभिषेक शर्माने 2 सिक्स मारताच तो हार्दिक पांड्याचा रेकॉर्ड मोडणार आहे. टी 20 सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवला जाणार आहे. अभिषेक शर्माने 7 सामन्यांत इंग्लंडविरुद्ध 347 रन्स केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याने आतापर्यंत 26 सिक्स मारले आहेत. आयर्लंड दौऱ्यापासून अभिषेक शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रभावी ठरले आहेत, पण त्यानंतर धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मँचेस्टरमध्ये आतापर्यंत एकूण १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ चार सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले असून पाच सामने रद्द झाले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १५० धावा आहे. इंग्लंडने या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले असून, सात सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल.
सर्वाधिक सिक्सर मारणारे भारतीय खेळाडू
हार्दिक पांड्या: २७ षटकार
अभिषेक शर्मा: २६ षटकार
विराट कोहली: १९ षटकार
रोहित शर्मा: १८ षटकार
सूर्यकुमार यादव: १८ षटकार
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. यावेळी पाऊस पडण्याची २० टक्के शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.






