इशान किशन झाला रन आउट (फोटो- ट्विटर)
काल भारत अन् इंग्लंडमध्ये टी 20 सिरिज सुरू झाली आहे. मात्र इशान किशन पहिल्या सामन्यात रन आउट झाला आहे. अभिषेक शर्मा आणि इशान किशनमध्ये चुकीच्या कॉलमुळे किशनला आपली विकेट गमवावी लागली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्यातील संवाद देखील व्हायरल झाला आहे.
आयर्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का बसला. संजू सॅमसन स्वस्तात बाद झाल्यानंतर, पुढच्याच काही बॉलमध्ये इशान किशन चुकीच्या कॉलमुळे रन आउट झाला. अभिषेक शर्मा आणि त्याच्या विसंवाद झाल्यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली.
लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल
भारत फलंदाजी करताना मैदानात इशान किशन आणि अभिषेक शर्मा खेळत होते. इशान किशनने एक बॉल मिड विकेटकडे मारला आणि रन धावण्यासाठी पळाला. मात्र, नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या अभिषेक शर्माने पाहिले की इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने बॉल अडवून थ्रो केला आहे. त्यामुळे त्याने रन घेण्यास नकार दिला. तोपर्यंत ईशान किशन अर्ध्या खेळपट्टीच्या पुढे निघून गेला होता. त्याने क्रिजमध्ये परतण्यासाठी एक लांब डाईव्ह मारली खरी, पण तोपर्यंत जोस बटलरने त्याला रनआउट केले होते.
A costly mix-up in the middle. 🫣 Moments after the run-out: Abhishek Sharma and Ishan Kishan share a brief conversation.#ENGvIND 1st T20I 👉 Streaming LIVE on JioHotstar! pic.twitter.com/1kagvrBjV9 — Star Sports (@StarSportsIndia) July 1, 2026
‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर
यानंतर इशान किशन आणि अभिषेक शर्माचा संवाद व्हायरल झाला आहे. अभिषेक शर्मा रागवलेला होता. इशान किशन म्हणाला, तू धावला का नाहीस? माझा कॉल होता ना? त्यावर अभिषेक शर्मा काय करतोय यार ईशान! पहिले बॉल तर पाहायचा ना, असे म्हणाला. काय वाटतंय, आऊट आहे की नॉट आऊट? असे अभिषेक ने विचारल्यावर इशानने क्लोज वाटत आहे असे उत्तर दिले.






