नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात (Australia) रंगाणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानच्या (Afgansitan) संघानं १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आशिया कप २०२२ च्या सुपर-४ फेरीतून बाहेर झालेल्या अफगाणिस्तानच्या संघाची धुरा आता मोहम्मद नबी संभाळणार आहे. तर, आशिया चषकात अफगाणिस्तानच्या संघाचा भाग असलेल्या पाच खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
१६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी २० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असून २२ ऑक्टोबरपासून सुपर १२ सामने खेळले जाणार आहेत. यंदाच्या विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न मध्ये खेळवला जाणार असून अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. विश्वचषकात अफगाणिस्थानच प्रतिनिधित्व करण्यात येणाऱ्या टीममधून समीउल्लाह शिनवारी, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर जजई, करीम जनत आणि नूर अहमद यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू आशिया कपमध्ये अफगाणिस्तानच्या संघाचे भाग होते. यापैकी अफसर जजईचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नूर मलिकजाई टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघाबाबत बोलताना म्हणाले की, ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानच्या संघात उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. या स्पर्धेत आफगाणिस्तानचा संघ चांगली कामगिरी बजावेल,अशी अपेक्षा आहे.”
असा आहे अफगानिस्तानचा संघ:
मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान (उपकर्णधार), रहमनुल्लाह गुरबज (यष्टीरक्षक), अजमतुल्लाह ओमरजई, दरवेश रसूली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारूकी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जादरान, मुजीब उर रहमान, नवीन अहमद हक, कैस अहमद, राशिद खान, सलीम सफी, उस्मान गनी. तर राखीव खेळाडू: अफसर जजई, शराफ़ुद्दीन अशरफ, रहमत शाह, गुलबदीन नायब.