कोलकाता नाइट रायडर्स खेळाडूंची यादी 2025; कॅप्टन विकत नाही, एकामागून एक फिनिशर, लिलावानंतर संपूर्ण संघ कसा?
Kolkata Knight Riders Players 2025 List : कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधाराला सोडून इतर खेळाडू कायम ठेवलेत, त्यांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जातेय. गतविजेता KKR कदाचित त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर, मिचेल स्टार्क, नितीश राणा आणि फिल सॉल्टसारख्या खेळाडूंना पुन्हा खरेदी करण्यात अपयशी ठरला असेल, परंतु असे असूनही, संघाने काही चांगले खेळाडू जोडून स्वतःला मजबूत केले आहे. कोलकाता नाइट रायडर्सने आपल्यासोबत टीम मध्ये गेमचेंजर खेळाडू कायम ठेवले आहेत.
व्यंकटेश अय्यरवर मोठी रक्कम
कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या ताफ्यात काही खेळाडू कायम ठेवले आहेत. परंतु, ते मोठे खेळाडू घेण्यात अपयशी ठरले आहेत. अनेक दिग्गजांना केकेआरने सोडले आहे. असे असताना काही खेळाडूंवर त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. व्यंकटेश अय्यरवर त्यांनी तब्बल 23.75 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर सुनील नारायणला सुद्धा त्यांनी आपल्या ताफ्यात ठेवले आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने अष्टपैलू व्यंकटेश अय्यरसह त्यांच्या आयपीएल 2024-विजेत्या संघातील चार खेळाडूंना 23.75 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर मेगा लिलावात चांगला करार केला. केकेआरचे संपूर्ण लक्ष मर्यादित बजेटमध्ये अव्वल खेळाडूंना खरेदी करण्यावर होते आणि ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले. त्यांना रोवमन पॉवेल, उमरान मलिक, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, स्पेन्सर जॉन्सन सारखे खेळाडू अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळाले.
रिलीज झालेल्या खेळाडूंची यादीः श्रेयस अय्यर, रहमानउल्ला गुरबाज, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, फिल सॉल्ट, केएस भरत, मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, सुयश शर्मा, अल्लाह गझनफर, दुष्मंता चमेरा, साकिब अरविरा हुसेन, वाकब हुसेन. मिचेल स्टार्क, चेतन साकारिया
पंजाब किंग्जने खेळला मोठा डाव
पंजाब किंग्जने मेगा लिलावात श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांच्यावर प्रत्येकी 18 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मॅक्सवेल, स्टॉइनिससारखे ऑलराऊंडरसुद्धा संघाने आपल्या ताफ्यात सामील केले. शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंगसारख्या भारतीय खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे.
दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना कायम ठेवून मोठा जुगार
पंजाब किंग्जने मेगा लिलावापूर्वी केवळ दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना कायम ठेवून मोठा जुगार खेळला होता. पंजाब फ्रँचायझीला त्यांचा संपूर्ण संघ नव्याने लिलावात तयार करायचा होता. सर्वाधिक पर्स घेऊन लिलावात उतरलेल्या पंजाबने मोठी रक्कम भरून श्रेयस अय्यरला करारबद्ध केले आहे. एक-दोन दिवसांत त्याला कर्णधार बनवण्याबाबत अधिकृत दुजोरा मिळेल. 2024 मध्ये कोलकाता चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरला 26.75 रुपयांची बोली लागली. पंजाब किंग्जने भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांच्यावर प्रत्येकी 18 कोटी रुपये खर्च केले. लिलावात ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा आणि हरप्रीत ब्रार यांसारख्या अनेक भारतीय आणि परदेशी अष्टपैलू खेळाडूंचाही या संघात समावेश होता.