मुंबई : कतार येथे आयोजित केलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. ३६ वर्षानंतर देशाला फुटबॉल मध्ये विश्वविजेता बनवण्याचे मेस्सीचे स्वप्न यंदा पूर्ण झाले. यावेळी मेस्सी आपल्या कुटुंबासोबत मैदानावर आनंद साजरा करताना दिसला. मात्र असे असतानाच लिओनेल मेस्सीने मात्र त्याचा लहान मुलगा किरोला सावत्र वागणूक दिल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. सध्या या क्षणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लिओनेल मेस्सीला थियागो, मातेओ आणि किरो अशी 3 मुलं आहेत. सेलिब्रेशन सुरु असताना मेस्सी त्याचा दुसरा मुलगा मातेओला मांडीवर घेऊन बसलेला दिसतोय. मातेओ यामध्ये फार खूश दिसून येतोय. त्याच्याच मागे किरो (Ciro Messi) हा शांतपणे बसला आहे. किरोकडे कोणीच बघत नसतं. आपल्याकडे लक्ष नाही म्हणून तो लिओनेलला बोलावून काहीतरी दाखवण्याचाही प्रयत्न करतो. मात्र पुन्हा काही कारणाने मेस्सी किरोकडे दुर्लक्ष करतो.
किरोचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावुक झाले आहेत. मेस्सी आपल्याच लहानग्या मुलासोबत असं का वागतोय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मिम्स देखील बनवले आहेतं.