भारतीय टीम(फोटो-सोशल मीडिया)
Bronco Test : बीसीसीआय खेळाडूंच्या फिटनेसबाबत मोठा बदल करणार आहे. खेळाडूंची पातळी वाढवण्यासाठी बीसीसीआयनकडून एक नवीन ब्रोंको नावाची टेस्ट सादर केली आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेस पातळीची चाचणी घेण्यासाठी बीसीसीआयकडून आतापर्यंत यो-यो टेस्ट वापरत करण्यात येत असे. भारतीय संघाचे आरोग्य आणि ताकद आणि कंडिशनिंग प्रशिक्षक असलेले एड्रियन ले रॉक्स यांनी ब्रोंको टेस् सादर केली आहे. आता यो-यो नंतर खेळाडूंना ब्रोंको टेस्टमधून जावे लागणार आहे. ब्रोंको टेस्ट म्हणजे काय, त्याचा भारतीय खेळाडूंना किती फायदा होणार आहे? आणि खेळाडूंसाठी का गरजेची आहे? याबबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या
ब्रोंको टेस्टची फिटनेस पातळी ही रग्बी खेळाशी संबंधित असून खेळाडूंची फिटनेस पातळी आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी ही चाचणी लागू केली गेली आहे. ब्रोंको टेस्टमध्ये, खेळाडूला सतत धावावे लागते. प्रथम तुम्हाला २० मीटर, नंतर ४० मीटर आणि ६० मीटर असे धावावे लागते. तिन्ही शर्यती एकत्रित करून एक संच तयार केला गेला आहे.
या चाचणी दरम्यान, खेळाडूंना पाच सेट पूर्ण करावे लागणार आहेत. ज्यामध्ये एकूण १२०० मीटर धावणे आवश्यक असणार आहे. सर्व सेट ६ मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागणार आहे. कमी वेळेत सतत धावणे हा भाग ही सेट अधिक कठीण बनवते. ही चाचणी विशेषतः वेगवान गोलंदाजांसाठी पुढे आणण्यात आली आहे. प्रशिक्षक कर्मचाऱ्यांन असे वाटते की खेळाडू मैदानापेक्षा जिममध्ये जास्त वेळ घालवत असतात. जिमपेक्षा मैदानावर धावणे हे अधिक चांगले आहे. म्हणूनच या चाचणीला आणण्यात आले आहे.
ब्रोंको चाचणी गोलंदाजांसाठी आणण्यात आली आहे. जलद गोलंदाज थकल्याशिवाय लांब स्पेलसाठी गोलंदाजी करू शकतील आणि त्यांचा वेग कायम ठेवू शकणार की नाही याची खात्री करणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय वेगवान गोलंदाजांना दीर्घ स्पेलचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना त्रास जाणवू लागला होता.
मिळालेल्या वृत्तानुसार, काही भारतीय खेळाडूंकडून अलीकडेच बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ब्रोंको चाचणी देण्यात आली आहे. आतापर्यंत बीसीसीआय ही यो-यो टेस्ट आणि २ किमी धावणे यासारख्या फिटनेस चाचण्या घेत आली आहे. परंतु आता या प्रक्रियेत ब्रोंको टेस्टचा देखील समावेश झाला आहे.
हेही वाचा : ‘बोलू-चालू शकत नाही, पण ते चॅम्पियन..’, विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; भावाने दिली माहिती..