विनोद कांबळी(फोटो-सोशल मीडिया)
Vinod Kambli health update : भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी अनेक वेळा चर्चेत येत असतो. आता पुनः तो चर्चेत आला आहे. आता चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे त्याची बिघडत जाणारी तब्येत. सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र असलेला विनोद कांबळी सध्या आर्थिक आणि शारीरिक दोन्ही बाबतत संघर्ष करत आहे. विनोद कांबळीच्या प्रकृतीचे कारण म्हणजे याला असलेले ड्रग्जचे व्यसनअ आहे. तो बराच काळ रुग्णालयात होता. आता अशातच त्याचा भाऊ वीरेंद्र कांबळीने विनोद कांबळीची तब्बेत बरी नसल्याचे सांगितले आहे.
विनोद कांबळीचा भाऊ वीरेंद्र कांबळीने त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. त्याने सांगितले की विनोद कांबळीला बरे होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्याने असे देखील सांगितले की, तो आजारातून बरा होण्याचा प्रयत्न करत आहे.
विनोद कांबळीचा भाऊ वीरेंद्रने एका शोमध्ये विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. शो दरम्यान तो म्हणाला, “त्याची प्रकृती आता स्थिर असून तो घरी आहे. त्याच्यावर घरीच उपचार सुरू असून त्याला बोलण्यास त्रास होत आहे. त्याला बरे होण्यास वेळ लागणार आहे. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे, मला विश्वास आहे की तो लवकरच धावण्यास आणि चालण्यास सुरू करेल. मला आशा आहे की तुम्ही त्याला लवकरच मैदानावर पहाल.”
वीरेंद्र कांबळी पुढे म्हणाला की, “त्याचे संपूर्ण शरीर तपासण्यात करण्यात आल्या आहेत. त्याने १० दिवसांचे पुनर्वसन देखील पूर्ण केले आहे. मेंदू आणि मूत्र चाचण्यांचे निकाल चांगले आहेत. मात्र सध्या तो चालू शकत नाही, ज्यामुळे त्याला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिल गेला आहे. सध्या तो बोलताना अडखळत आहे.” शो दरम्यान, विनोद कांबळीच्या भावाने चाहत्यांना एक आवाहन देखील केले. तो म्हणाला की सर्वांनी विनोदची प्रकृती बारी होण्यासाठी प्रार्थना करावी.
हेही वाचा : Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ
विनोद कांबळी हा एकेकाळी सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला फलंदाज असल्याचे मानले जात होते. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात धमकेदार केली होती. पण त्याच्या वाईट सवयींमुळे त्याला क्रिकेटमध्ये फारशी प्रगती करता आली नाही. विनोद कांबळीने भारतीय संघासाठी एकूण १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १०८४ धावा केल्या असून एकदिवसीय सामन्यात त्याने २४७७ धावा केल्या आहेत. तर, कसोटीत ३ अर्धशतके, ४ शतके आणि २ द्विशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, त्यांच्याकडे १४ अर्धशतके आणि २ एकदिवसीय सामन्यात शतके लागावली आहे.