न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन या टेनिस विश्वातील या वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला (Grand Slam tournament) २९ ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. यावेळी महिला एकेरीच्या लढतीत सेरेना विल्यम्सच्या (Serena Willams) कामगिरीकडे तमाम टेनिसप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. ही स्पर्धा तिच्या कारकीर्दीतील अखेरची असेल, असे तिने संकेत दिले आहेत. त्यामुळे अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम जिंकून सेरेना मार्गरेट कोर्टच्या सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी करते का, हे पाहणे या वेळी औसुक्याच ठरणार आहे.
सेरेनाने अखेरचे ग्रँडस्लॅम जेतेपद २०१७ मध्ये पटकावले होते. तिने त्यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर मात्र मागील ५ वर्षांमध्ये तिला एकाही ग्रँडस्लॅमच्या जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. गेल्या काही काळामध्ये कुटुंब आणि दुखापत यामुळेही तिला सातत्याने टेनिस कोर्टपासून दूर राहावे लागत आहे. आपल्या कुटुंबाला तसेच व्यवसायाला वेळ देण्यासाठी सेरेना आंतरराष्ट्रीय टेनिसला अलविदा करणार असल्याचे तिएन काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया करून सांगितले होते. .