फोटो सौजन्य - Viralbhayani इंस्टाग्राम
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळ्याची (Anant-Radhika’s Sangeet Celebration) चर्चा जगभरामध्ये सुरु आहे. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी भारताचे अनेक क्रिकेटर्स सुद्धा उपस्थित होते. भारताच्या क्रिकेट संघाने काही दिवसापूर्वीच T२० विश्वचषक २०२४चे जेतेपदक मिळवून त्याचा उत्साह देशभरात साजरा करण्यात आला. आता टीम इंडियाचे चॅम्पियन्स अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यामध्ये ५ जुलै रोजी सहभागी झाले होते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या यादीमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा सुद्धा समावेश आहे.
भारतीय क्रिकेटर्समध्ये एमएस धोनी, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या खेळाडूंचा समावेश आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह शुक्रवारी १२ जुलै रोजी होणार आहे. त्याआधी लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत, ज्यामध्ये अनेक क्रिकेटपटूंनी संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. काही जण कुटुंबासह तर अनेकजण एकटेच पोहोचले. हार्दिक पांड्या आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला पोहोचला होता. हार्दिकसोबत त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या आणि पत्नी पंखुरी शर्मा दिसले. याशिवाय हार्दिकसोबत त्याचा सहकारी क्रिकेटर इशान किशनही दिसला.
भारताच्या खेळाडूंचा मायदेशी परतल्यानंतर मोठ्या उत्साहात देशभरात स्वागत करण्यात आले. T-२० विश्वचषक जिंकणाऱ्या चॅम्पियन संघाचा भाग असलेल्या सूर्यकुमार यादवनेही संगीत सोहळ्याला हजेरी लावली. सूर्या त्याची पत्नी देविशा शेट्टीसोबत दिसला. यावेळी सूर्याने शेरवानी घातली होती आणि पत्नीने काळी साडी परिधान केली होती.
केएल राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी देखील या संगीताचा एक भाग बनला होता. भारतीय विकेटकीपर फलंदाज काळ्या ड्रेसमध्ये दिसला.
या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे. धोनीही पत्नी साक्षीसोबत पोहोचला. माहीने कुर्ता घातला होता, तर साक्षीनेही खूप सुंदर दिसत होती.
भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या देखील अनंत अंबानींच्या संगीत सोहळ्यात सहभागी झाला होता यावेळी तो त्याचा भाऊ कृणाल पंड्या, त्याची वहिनी पंखुरी शर्मा आणि त्याचा संघातील साथीदार ईशान किशन सोबत दिसला.