For scoring the fastest fifty of the season in a match-winning run chase, @nicholas_47 bagged the Player of the Match award 👏👏@LucknowIPL move to the 🔝 of the table with that resounding victory 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/Ot7HF37ojr
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसिद्धीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सोमवारी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार या मोसमातील हा संघाचा पहिलाच गुन्हा आहे आणि त्यामुळे कर्णधार फाफ डुप्लेसिसला १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
आवेश खानला बसला फटका :
आवशे खानने सामना संपल्यानंतर त्याच्या संघाने म्हणजेच लखनऊ संघाने सामना जिंकला, त्यावेळेस आवेश खान स्ट्राईकवर होता आणि त्याने शेवटची धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. या विजयाच्या आवेगात त्याने त्याचं हेल्मेट हवेत भिरकावलं. यामुळे त्याला ओरडा खावा लागला आहे.
लखनौच्या गोलंदाजालासुद्धा दंड :
तर मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खानवर कोणताही आर्थिक दंड ठोठावण्यात आलेला नाही. त्याला फक्त ताकीद देण्यात आली आहे. या रिलीझमध्ये म्हटले आहे की, लखनऊ सुपरजायंट्सच्या आवेश खानला आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. आवेशने आयपीएल आचारसंहितेच्या पहिल्या पायरीतील गुन्ह्याची कबुली दिली आहे. आचारसंहितेच्या पहिल्या पायरीतील गुन्ह्यामध्ये सामनाधिकारींचा निर्णय अंतिम असतो.