ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड प्रकरणी आरोपी अटकेत(फोटो-सोशल मीडिया)
Australian women cricketers molestation case : भारतात सध्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू असून अनेक संघ आमनेसामने येत आहेत. २५ ऑक्टोबर रोजी विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आमनेसामने आले होते. हा सामना इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छळ करण्यात आला होता. दोन्ही खेळाडू हॉटेल रेडिसन ब्लू सोडून एका कॅफेमध्ये जात असताना दुचाकीवरून आलेल्या काही गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात होती. या अटक करण्यात आलेल्या अकील खानला न्यायालयाने १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
अतिरिक्त डीसीपी (गुन्हे) राजेश दंडोटिया यांनी आयएएनएसला माहिती देताना सांगितले की, “घटनेच्या ६ तासांत आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्या बाईकला नंबर प्लेट लावलेली नव्हती. अटकेनंतर, न्यायालयातून एक दिवसाची पोलिस कोठडी मागण्यात आली. पोलिस कोठडीनंतर, रविवारी संध्याकाळी आरोपीची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्तीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीच आहे. इंदूर पोलिस अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत आहेत.”
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ सध्या २०२५ च्या विश्वचषकासाठी भारतात आला आहे. २५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियन संघाचा दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या सामन्यापूर्वी, दोन ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना त्रास देण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रेडिसन ब्लू हॉटेलमधून एका कॅफेकडे चालत जात असताना खेळाडूंचा आरोप आहे की मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाने त्यांचा विनयभंग केला. त्यांनंतर त्यांच्याकडून ताबडतोब पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
हेही वाचा : शतक झळकावल्यानंतर करुण नायरने निवडकर्त्यांवर साधला निशाणा! टीम इंडियामधून वगळल्याबद्दलचा व्यक्त केला राग
सीसीटीव्ही फुटेज, हॉटेल रेकॉर्ड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जबाबांची तपासणी केल्यानंतर, पोलिसांकडून गुन्हेगाराला अटक करण्यात आली. आरोपीची मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर, स्पर्धा आयोजक आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील टीम हॉटेल्स, प्रशिक्षण मैदाने आणि स्टेडियमभोवती सुरक्षा अधिक वाढवली आहे.






