फोटो सौजन्य - X
आशिया कप 2025 च्या तयारीला सर्व संघ लागले आहेत, या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये आता या स्पर्धेमध्ये दोन गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ आहेत. तर दुसऱ्या गटामध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि हाॅंगकाॅंग हे देश आहेत. २०२५ च्या टी-२० आशिया कपसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) या मोठ्या स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची निवड केली आहे.
३ खेळाडूंना राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. अनुभवी अष्टपैलू राशीद खान आशिया कपमध्ये संघाचे नेतृत्व करेल. संघात अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी आहे, तर अनेक तरुण खेळाडूंनाही या संघात स्थान देण्यात आले आहे. हा संघ फिरकीपटूंनी भरलेला आहे, कारण फिरकीपटूंना युएईमधील खेळपट्टीवरून खूप मदत मिळते.
अफगाणिस्तान संघातील फिरकीपटूंबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार रशीद खान व्यतिरिक्त, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, अल्लाह गझनफर, नूर अहमद आणि शराफुद्दीन अश्रफ यांची नावे समाविष्ट आहेत. अशा प्रकारे, १७ सदस्यीय संघात ६ फिरकीपटूंचा समावेश आहे. याशिवाय, एका फिरकीपटूचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे. फिरकी गोलंदाजीवर अवलंबून राहून, अफगाणिस्तान संघ आशिया कपमध्ये अव्वल संघांशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. फिरकी ब्रिगेडच्या मदतीने कर्णधार रशीद खान जबाबदारी स्वीकारण्याची तयारी करत आहे.
𝐒𝐐𝐔𝐀𝐃 𝐀𝐋𝐄𝐑𝐓! 🚨
Here’s AfghanAtalan’s Squad for the ACC Men’s T20 Asia Cup 2025, which is all set to be held from September 9 to 28 in the UAE. 🤩
Prior to the Asia Cup, AfghanAtalan will also face the hosts UAE and Pakistan in a T20I Tri-Nation Series, starting this… pic.twitter.com/5uxXUxKMma
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 24, 2025
रशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, दरविश रसूली, सेदीकुल्लाह अटल, अजमतुल्ला उमरझाई, करीम जनात, मोहम्मद नबी, गुलबद्दीन नायब, शराफुद्दीन अश्रफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गझनफर, नूर अहमद, फरीद अहमद मलिक, फरीद अहमद मलिक, नविन हज्जार, फरीद खान
राखीव खेळाडू: वफीउल्ला तरखिल, नांगयाल खरोटे आणि अब्दुल्ला अहमदझाई