सलमान अली आगा आणि चरिथ असलांका(फोटो-सोशल मीडिया)
Sri Lanka vs Pakistan, Asia Cup Super 4 : आशिया कप २०२५ स्पर्धेत आता सुपर ४ सामने खेळले जात आहेत. आतापर्यंत २ सुपर ४ सामने खेळून झाले आहेत. आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सुपर ४ चा तिसरा सामना खेळला जाणार आहे. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर श्रीलंका प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहेत.
हेही वाचा : Asia cup 2025 : पाकिस्तानसह श्रीलंकन खेळाडूंच्या रडारवर अभिषेक शर्मा! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघाना या सामन्यात विजय मिळवणे महत्वाचे असणार आहे. कारण, यापूर्वी दोन्ही संघांना सुपर ४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आशिया कपच्या पहिल्या सुपर ४ च्या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. या सामन्यात बांगलादेश संघाने विजय मिळवला होता. तर सुपर ४ च्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघ या सामन्यात विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील.
पाकिस्तानचा साहिबजादा फरहानकडून संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे. त्याने भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण खेळीने प्रभावित केले होते. श्रीलंकेच्या दासुन शनाकाने बांगलादेशविरुद्ध उशिरा केलेल्या धक्काने त्याचे मूल्य दाखवून दिले आहे. काही खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने, ही लढत रोमांचक होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड बघितला तर त्यामध्ये पाकिस्तानचे पारडे जड दिसून येते. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये २३ सामने झाले आहेत, ज्यात पाकिस्तानने १३ सामने आपल्या नावे केले आहे तर श्रीलंकेने १० सामने जिंकले आहेत. पण मागील ५ सामन्यांचा विचार केल्यास त्यात श्रीलंकेचा दबदबा दिसून येत आहे. दोन्ही संघांमधील मागील ५ सामन्यांत श्रीलंकेनेच बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
श्रीलंका संघ : पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, चरिथ असलांका (कर्णधार), दासुन शनाका, कामिंडु मेंडिस, वानिंदु हसरंगा, दुष्मंता चमीरा, नुवान तुषारा, नुवानिदु फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा.
पाकिस्तान संघ : सैम अयूब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद,