फोटो सौजन्य - Indian Football Team
सीएएफए नॅशनल कॅम्प फुटबॉलचा काल ब्राँझ मेडल्स सामना पार पडला. हा सामना भारत विरुद्ध ओमन या देशात दोन देशांमध्ये खेळवण्यात आला होता. कतार विरुद्ध झालेल्या वादग्रस्त सामन्यानंतर भारताचे संघाने दमदार कामगिरी करत कास्यपदक नावावर केले आहे. भारत विरुद्ध ओमन यांच्यामध्ये झालेला हा सोमवारी 8 सप्टेंबर रोजी सामना टीम इंडिया साठी ऐतिहासिक ठरला. टीम इंडिया नेहा सामना 31 वर्षानंतर ओमानविरुद्ध जिंकला.
सोमवारी ताजिकिस्तानमधील हिसोर सेंट्रल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने ओमानचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-२ असा पराभव केला. यासह भारताने CAFA नेशन्स कप २०२५ मध्ये तिसरे स्थान मिळवले. भारत आणि ओमान यांच्यातील सामना निर्धारित वेळेपर्यंत १-१ असा बरोबरीत राहिला. ५५ व्या मिनिटाला ओमानकडून अल यहमादीने गोल केला. त्यानंतर ८० व्या मिनिटाला उदांता सिंगने गोल करून भारताला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.
India are #CAFANationsCup2025 BRONZE MEDALISTS! 🥉🇮🇳#INDOMA #BlueTigers #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/2ZNmiZjQhw
— Indian Football Team (@IndianFootball) September 8, 2025
९० मिनिटांनंतर १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ खेळवण्यात आला ज्यामध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. पुन्हा एकदा सामना १५ मिनिटे वाढवण्यात आला आणि यावेळीही दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. भारताकडून चांगटे, भेके आणि जितिन यांनी पेनल्टी शूटआउटमध्ये गोल केले. गुरप्रीतने अल यहमादीचा पेनल्टी स्ट्रोक रोखून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
फिफा रँकिंगमध्ये १३३ व्या क्रमांकावर असलेल्या भारतासाठीही हा विजय खास होता, कारण त्याने ७९ व्या क्रमांकावर असलेल्या ओमानला हरवले. भारताने ३१ वर्षांनंतर ओमानला हरवले. याशिवाय, गेल्या १० सामन्यांमध्ये भारतीय संघ ओमानला हरवू शकला नाही. ओमानने १० पैकी सात सामने जिंकले होते तर तीन सामने अनिर्णित राहिले.
नक्की झालं काय? रोहित शर्मा रात्री उशिरा का पोहोचला हाॅस्पिटलमध्ये? चाहते चिंतेत; Video Viral
या सामन्यातील दोन्ही गोल दुसऱ्या हाफमध्ये झाले. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा झाली. भारताचा चेंडूवर ताबा निश्चितच जास्त होता, परंतु गोल करण्याच्या अनेक संधी त्यांनी गमावल्या. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांमध्ये जोरदार स्पर्धा झाली, परंतु कोणीही गोल करण्यात यशस्वी झाले नाही.
दोन्ही संघांनी आपापल्या गटात दुसरे स्थान पटकावले, ज्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. २००० पासून भारताने ओमानविरुद्ध नऊ पैकी सहा सामने गमावले आहेत. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना मार्च २०२१ मध्ये खेळला गेला होता जो १-१ असा बरोबरीत सुटला.