आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ (photo Credit- X)
Asia Cup 2025: आशिया कपचा 2025 थरार (Asia Cup 2025) लवकरच सुरु होणार आहे. सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) पोहोचले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार असून, संघात शुभमन गिल, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ मजबूत दिसत असला तरी, माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याच्या मते, एका खेळाडूची अनुपस्थिती संघाला नक्कीच जाणवेल.
कैफने ज्या खेळाडूच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तो दुसरा कोणी नसून स्टार अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर आहे. आशिया कपसाठीच्या मुख्य 15 खेळाडूंमध्ये सुंदरला स्थान मिळाले नाही, त्याला 5 राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ, जर एखादा खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला, तरच त्याला संघात प्रवेश मिळू शकेल. कैफच्या मते, सुंदरला मुख्य संघात स्थान मिळायला हवे होते.
Rohit’s team won the T20 World Cup with 3 all-rounders – Axar, Jadeja, Hardik – and that meant 6 proper bowling options and batting till 8. At Asia Cup, with only 2 genuine allrounders – Hardik and Axar. – India will have to find a new winning combination. Washington Sundar will…
— Mohammad Kaif (@MohammadKaif) September 8, 2025
मोहम्मद कैफने 2019 च्या टी-20 विश्वचषकातील विजयाचे उदाहरण देत सांगितले की, संघात जास्त गोलंदाजीचे पर्याय असणे किती आवश्यक आहे. कैफने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “रोहितच्या संघाने टी-20 विश्वचषक अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या तीन अष्टपैलू खेळाडूंसह जिंकला होता. याचा अर्थ त्यांच्याकडे गोलंदाजीचे 6 चांगले पर्याय आणि फलंदाजीचे 8 पर्याय होते. आशिया कप 2025 मध्ये भारताकडे फक्त दोनच मुख्य अष्टपैलू खेळाडू आहेत – हार्दिक आणि अक्षर. त्यामुळे भारताला एक नवीन विजयी संयोजन शोधावे लागेल. याच कारणामुळे वाशिंग्टन सुंदरची उणीव नक्कीच भासेल.”
वाशिंग्टन सुंदरच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने भारतासाठी आतापर्यंत 54 टी-20 सामन्यांत 193 धावा केल्या असून, 48 विकेट्सही घेतल्या आहेत. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करणाऱ्या सुंदरची गोलंदाजी शैली निवृत्त झालेल्या आर. अश्विनसारखी आहे, म्हणूनच त्याला भारताचा ‘दुसरा अश्विन’ असेही म्हटले जाते.
आशिया कप 2025साठी भारतीय संघ: