दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव (फोटो-सोशल मिडिया)
AUS vs SA : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात युवा आणि स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीसच्या शतकाच्या जोरावर साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर २१९ धावांचा लक्ष्य ठेवले होते. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद १६५ धावा करू शकला. या साऊथ आफ्रिकेसाठी करो वा मरोच्या या सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हीसने विक्रमी शतक ठोकून आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया संघ १६५ धावांवर ढेपाळला आणि साऊथ अफिरकेने या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. डेवाल्ड ब्रेव्हीस साऊथ आफ्रिकेच्या विजयाचा सामन्याचा हिरो ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून टीम डेव्हिडने सर्वाधिक ५० धावा केल्या तर साऊथ आफ्रिकेकडून क्वेना मफाका आणि कॉर्बिन बॉश या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रेकिने दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियावचा ५३ धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाचा संघ २० ओव्हर देखील खेळू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेने १६५ धावांवर गुंडाळलं आहे. या विजयासह साऊथ आफ्रिकेने या विजयसह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे आता शनिवारी १६ ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अटीतटीचा सामना पाहायला मिळेल.
टीम डेव्हिडने एकाकी झुंज देऊन स्फोटक अर्धशतक ठोकले. परंतु तो ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून देऊ शकलेला नाही. टीम डेव्हिडने २४ चेंडूचा सामना करत ५० धावा केल्या. यामध्ये त्याने ४ चौकारांनी ४ षटकार खेचले. या सामन्यात डेव्हिडव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. एलेक्स कॅरी, कर्णधार मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि बेन द्वारशुइस या चौघांना चांगली सुरुवात मिळाली असली तरी त्यांना काही खास करण्यात यश आले नाही.
हेही वाचा : PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..
ब्रेव्हीसने ब्रेव्हीसने ४१ चेंडूत टी २० कारकीर्दीतील पहिले शतक झळकावल. त्याने ५६ चेंडूचा सामना करत नाबाद १२५ धावांची वादळी खेळी साकारली. ब्रेव्हीसने या खेळी दरम्यान १२ चौकार आणि ८ षटकारांची आतिषबाजी केली. ब्रेव्हीस यासह दक्षिण आफ्रिकेसाठी टी २० मध्ये सर्वोच्च खेळी करणारा पहिला फलंदाज बनला आहे. ब्रेव्हीसने याबाबतीत फाफ डु प्लेसीसचा १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. फाफने २०१५ मध्ये विंडीज विरुद्ध ११९ धावांची खेळी केली होती.