डेवाल्ड ब्रेव्हीस(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs SA : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आहे. तर दुसऱ्या टी २० सामन्यात युवा आणि स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीसच्या शतकाच्या जोरावर साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर २१९ धावांचा लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या टी २० सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हीसने विक्रमी शतक ठोकले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने २०० च्या पुढे मजल मारली आहे.प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया कशी खेळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
हेही वाचा : PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..
डेवाल्ड ब्रेव्हीसने झळकलेल्या विक्रमी शतकाबरोबर त्याने अनके विक्रम मोडले आहेत. तसेच ब्रेव्हीसआधी दक्षिण आफ्रिकेच्या कुणा खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. डार्विनमधील अरारा क्रिकेट ग्राउंडमध्ये आज १२ ऑगस्ट रोजी खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात ब्रेव्हीस चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ब्रेव्हीसने सावध सुरवात केली खरी मात्र नंतर त्याने गिअर बदलला आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. या दरम्यान ब्रेव्हीसने आपले पहिलवहिले टी २० क्रिकेटमधील अर्धशतक पूर्ण केलं. ब्रेव्हीसने अर्धशतक ते शतक हा टप्पा अवघ्या १६ चेंडूत गाठला.
ब्रेव्हीसने ४१ चेंडूत टी २० कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. ब्रेव्हीस यासह दक्षिण आफ्रिकेसाठी टी २० सामन्यात शतक करणारा सर्वात युवा तर आणि डेव्हिड मिलर याच्यानंतरचा दुसरा फलंदाज ठरलाया आहे. ब्रेव्हीसने वयाच्या २२ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. तसेच मिलरने ३५ चेंडूत शतक ठोकले होते. तसेच याबरोबर दक्षिण आफ्रिकेची ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
हेही वाचा : क्रिकेटसाठी काय पण! तुम्हालाही हसू आवरता येणार नाही, असा रंगला पर्वतावर क्रिकेट सामना; पहा व्हिडिओ
ब्रेव्हीसने ५६ चेंडूत २२३.२१ च्या स्ट्राईक रेटने नाबाद १२५ धावांची वादळी खेळी साकारली. ब्रेव्हीसने या खेळी दरम्यान १२ चौकार आणि ८ षटकारांची आतिषबाजी केली. त्याने सीमापार टोलवलेल्या एकूण २० चेंडूत ९६ धावा जोडल्या. ब्रेव्हीस यासह दक्षिण आफ्रिकेसाठी टी २० मध्ये सर्वोच्च खेळी करणारा पहिला फलंदाज बनला आहे. ब्रेव्हीसने याबाबतीत फाफ डु प्लेसीसचा १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. फाफने २०१५ मध्ये विंडीज विरुद्ध ११९ धावांची खेळी केली होती.