Central Contract : नवीन केंद्रीय करार जाहीर; 3 क्रिकेटपटू इन तर 'या' खेळाडूंना बाहेरचा रस्ता
Aus Central Contract : ऐन आयपीएल 2025 च्या दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने नवा केंद्रीय करार जाहीर केला आहे. नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये एकूण 23 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे यावेळी 3 नवीन खेळाडूंना देखील केंद्रीय करारात सहभागी करून घेण्यात आले आहे. तर त्याच वेळी, तीन खेळाडू आहेत, त्यापैकी दोन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या संघाचा एक भाग होते, त्यांना नवीन करारातून वगळण्यात आले आहे.
सॅम कॉन्स्टास, मॅट कुन्हेमन आणि ब्यू वेबस्टर या नवीन खेळाडूंना प्रथमच केंद्रीय करारात स्थान देण्यात आले आहे. तर 23 खेळाडूंच्या नव्या यादीतून बाहेरचा रास्ता दाखवण्यात आलेले तीन खेळाडू म्हणजे टॉड मर्फी, शॉन ॲबॉट आणि ॲरॉन हार्डी. यापैकी ॲरॉन हार्डी आणि शॉन ॲबॉट हे देखील चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग राहिले आहेत. मात्र, तेथे त्यांना एकही सामना खेळण्याची संधी आली नाही. जर टॉड मर्फीबद्दल सांगायचे झाले तर, श्रीलंकेच्या शेवटच्या दौऱ्यावर खेळलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून तो ऑस्ट्रेलियन संघात समाविष्ट करण्यात आले होते. पण, ऑस्ट्रेलियाला 2025-26 मध्ये आशिया दौरा करणार नाहीये.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या तीन नवीन खेळाडूंपैकी सॅम कॉन्स्टासबद्दल सांगायचे झाले तर, तो सध्या कसोटी प्रकारात ऑस्ट्रेलियाचा भाग आहे. मेलबर्न आणि सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये देखील तो भारताविरुद्ध 2 कसोटी सामने खेळलाअ आहे. तसेच श्रीलंका दौऱ्यावर मिळालेल्या यशाचा फायदा मॅट कुनहेमनला देखील झाला आहे.
दुखापतींशी झुंज देऊनही, लान्स मॉरिस आणि झ्ये रिचर्डसन यांचे केंद्रीय करारात कायम राहिले आहेत. रिचर्डसनचे सध्या पुनर्वसन सुरू असून त्याच्या खांद्यावर तिसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. झेवियर बार्टलेटला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, केंद्रीय करारातील स्थान कायम राखण्यात त्याला यश आले आहे.
स्कॉट बोलँड, झे ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, कॅजोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, उस्मान ख्वाजा, जोश इंग्लिस, सॅम कॉन्स्टास, मॅट कुन्हमन, लान्स मॉरिस, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, झेवियर बार्टलेट, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झ्ये रिचर्डसन, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, ब्यू वेबस्टर.