बाबर आझम(फोटो-सोशल मिडिया)
Abar Azam T20 World XI team : पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमकडून नुकतीच त्याची टी-२० वर्ल्ड इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. ज्याची सद्या क्रिकेट चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. बाबर आझमने एका पॉडकास्टमध्ये त्याच्या एका संघाची निवड केली आहे. ज्यामध्ये त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या ११ खेळाडूंची निवड केली आहे. त्याच्या संघात फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंचे उत्तम मिश्रण दिसत आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे बाबरने विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूला त्याच्या संघात स्थान दिलेले नाही. तसेच सध्याच्या घडीचा सर्वात घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील त्याच्या संघात दिसत नाही.
बाबर आझमने त्याच्या ड्रीम टीममध्ये भारतातील २ खेळाडूंना स्थान दिले आहे. त्याच वेळी, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील प्रत्येकी २ खेळाडूंची त्याने निवड केली आहे. याशिवाय अफगाणिस्तानच्या एका खेळाडूला त्याने आपल्या संघात स्थान दिले आहे. बाबरने भारतीय कर्णधार रोहित शर्माची सलामीवीर म्हणून संघात निवड केली आहे. रोहित हा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दुसरा सलामीवीर म्हणून बाबरने त्याचा देशबांधव आणि यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला स्थान दिले आहे.
तसेच बाबरने त्याचा सहकारी फखर झमानला तिसऱ्या क्रमांकावर आणि भारताच्या सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी स्थान दिले. हे दोन्ही खेळाडू टी-२० क्रिकेटमध्ये त्यांच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. यानंतर बाबरने इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलरला त्याच्या संघात पाचव्या क्रमांकावर स्थान दिले आहे. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरला त्याने सहाव्या क्रमांकावर ठेवले आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून बाबरची पहिली पसंती दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅन्सेनला देण्यात आली. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानच्या रशीद खानकडे फिरकी गोलंदाजीची कमान सोपवली आहे.
बाबर आझमने त्याच्या संघात तीन वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. जे या काळातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक मानले जातात. बाबरच्या संघात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला वेगवान गोलंदाजीत वरचे स्थान दिले आहे. त्याच वेळी, बाबरने मिचेल स्टार्कचीही निवड केली आहे. पुढे बाबरने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडला त्याच्या संघात शेवटचा खेळाडू स्थान दिले आहे.
हेही वाचा : KKR vs RCB : IPL 2025 पुन्हा सुरू होताच आला मोठा अडथळा! RCB आणि KKR यांच्यातील सामना धोक्यात..
रोहित शर्मा, मोहम्मद रिझवान, फखर जमान, सूर्यकुमार यादव, जोस बटलर, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, रशीद खान, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, मार्क वुड.