यूएई : शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम खेळवण्यात आलेल्या आशिया कप (Asia cup 2022)मधील सुपर ४ च्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पक्षितांचा ५ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने श्रीलंकेला १२२ धावांचं आव्हान दिल होत. श्रीलंकेने १८ ओव्हरमध्येच १२२ धावांचे आव्हान पूर्ण करून सामान खिशात घातला. श्रीलंका आणि पाकिस्तान (Shri Lanka Vs Pakistan) हे दोन्ही संघानी आधीच फायनलमध्ये स्थान मिळवल्याने या सुपर फोर सामन्याच्या निर्णयाचा कोणताही फरक पडला नाही. मात्र सामन्या दरम्यान घडलेल्या एका घटनेवरून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam)भलताच चिडला आणि त्याला तो पाकिस्तान संघाचा कर्णधार आहे याची आठवण करून द्यावी लागली.
श्रीलंकेच्या डावाच्या १६ व्या षटकात वेगवान गोलंदाज हसन अली गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार दासून शनाकाने स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू यष्टीरक्षक रिझवानच्या हातात गेला. इकडे रिझवानला वाटले की बॅटला बॉल लागला आहे. रिझवानने अपील केले, पण मैदानी पंच अनिल चौधरी यांनी नाबाद घोषित केले. यानंतर कर्णधार बाबर आझमचा सल्ला न घेता रिझवानने रिव्ह्यूची मागणी केली.
मोहम्मद रिझवानच्या सांगण्यावरूनच पंचांनी रिव्ह्यू घेतला. मोहम्मद रिजवानच्या (Mohammad Rizwan) या कृतीवर बाबर आझम चिडलेला पहायला मिळाला. तो अंपायर जवळ येत मी कर्णधार आहे असे म्हणताना दिसला. मात्र बाबरने देखील नंतर डीआरएस घेण्याचे मान्य केले. मात्र संघाने हा रिव्ह्यू गमावला आणि शनाका नाबाद राहिला.