बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतो( फोटो-सोशल मीडिया)
Nazmul Hasan Shanto’s century for Sri Lanka : बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची धडाक्यात सुरवात केली आहे. त्याने गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. यासोबतच त्याने शतकाच्या जोरावर आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले आहे आणि संघाला संकटातून बाहेर काढण्याचे काम केले आहे. ४५ धावांत तीन विकेट गमावल्यानंतर बांगलादेशचा संघ संघर्ष करताना दिसून आला. अशा परिस्थित त्याने मुशफिकर रहीमसोबत संघचा डाव सावरला. रहीमने देखील शतक लगावले आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने २०२ चेंडूचा सामना करत ११ चौकार आणि १ षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. श्रीलंकेविरुद्ध हे त्याचे दुसरे शतक ठरले आहे, तर परदेशी भूमीवरील हे त्याचे तिसरे शतक आहे.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेका मंगळवार, १७ जून रोजी गॉल मैदानावर सुरवात झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ देखील या सामन्याने सुरू झाली आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु काही काळासाठी त्याचा निर्णय अयोग्य असल्याचे दिसून आले, जेव्हा बांगलादेशला पहिला धक्का ५ धावांवर बसला.
एकेकाळी तर बांगलादेश केवळ ४५ धावांवर तीन विकेट गमावून बसला होता. त्यानंतर शांतो आणि यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम यांनी जबाबदारी सांभाळत हळूहळू डाव पुढे नेला. या दोन्ही फलंदाजांनी संघाची धावसंख्या दोनशेच्या पुढे नेली. दरम्यान, शांतोने त्याच्या कारकिर्दीतील सहावे शतक देखील पूर्ण केले. त्यानंतर मुशफिकुर रहीमने देखील १८६ चेंडूचा सामना करत १०५ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शांतो १३६ वर तर आणि यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम १०५ वर नाबाद होते.
शांतोने श्रीलंकेविरुद्ध त्याच्याच भूमीवर हे त्याचे दुसरे शतक ठरले आहे, तर त्याने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध एक शतक झळकावले होते. तर शांतोने घरच्या मैदानावर तीन शतके झळकावली आहेत. यापैकी दोन अफगाणिस्तानविरुद्ध तर एक न्यूझीलंडविरुद्ध आले आहे. बांगलादेशी कर्णधाराने २०२१ मध्ये पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध १६३ धावांची खेळी साकारली होती. जी त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या सामन्यापूर्वी, शांतोने ३५ कसोटी सामन्यांमध्ये २९.०६ च्या सरासरीने १८८९ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. बांगलादेशने पहिल्या दिवसाअखेर ३ गडी गमावून २९२ धावा केल्या आहेत.