फोटो सौजन्य – iStock
अनेकदा बातम्या कानावर येतात की जीममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यु होता. आजकाल देशामध्ये त्याचबरोबर जगामध्ये देखील हृदयविकाराने मृत्यूची अनेक प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. काल अभिनेत्री शेफाली जरीवाला हीचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याआधी बिग बाॅस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे देखील निधन त्याचप्रकारे झाले होते. त्यामुळे मनोरंजन आणि क्रिकेट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. आता क्रिकेट मैदानातून अशीच एक घटना समोर आली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जिथे एका खेळाडूला सामना खेळताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खेळाडूचा मैदानावरच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ पाहुन तुम्हालाही धक्का बसेल. पंजाबमधील फिरोजपूर येथील गुरहर सहाय येथील डीएव्ही स्कूलच्या मैदानात क्रिकेटचा सामना सुरू होता. यादरम्यान फलंदाजाने एक मोठा षटकार मारला.
सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक
षटकार मारल्यानंतर, फलंदाज मैदानावर बसतो, त्यानंतर नॉन-स्ट्राइक एंडवर उभा असलेला त्याचा सहकारी फलंदाज त्याच्याकडे धावतो. लवकरच फलंदाज तोंड खाली पडतो. यावेळी त्याचा सहकारी हा त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की हे पाहून सर्व खेळाडू त्या फलंदाजाजवळ येतात. यानंतर काही खेळाडू फलंदाजाच्या हातांना मालिश करतात तर काही त्याच्या पायांना मालिश करतात, पण तो फलंदाज उठत नाही परंतु हा फलंदाज हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावरच मरण पावतो.
ख़ौफ़नाक दृश्य।
पंजाब के फिरोजपुर में क्रिकेट खेलते वक़्त एक खिलाड़ी ने जैसे ही ज़बरदस्त छक्का मारा,
अचानक दिल का दौरा पड़ा और उसी मैदान पर दम तोड़ दिया।ज़िंदगी वाकई पल भर की मेहमान है… 🕯️#Firozpur #HeartAttack #Cricketer pic.twitter.com/AsM3evT01T
— Ankit Rajput (@AnkitKu50823807) June 29, 2025
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या खेळाडूचे नाव हरजीत सिंग असल्याचे सांगण्यात येत आहे. तो ४९ धावांवर फलंदाजी करत होता. मैदानावरील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला सीपीआर देऊन त्याला पुन्हा जिवंत करण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही करता आले नाही.