Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: ‘हा रोहितचा शेवटचा सामना…’, BCCI ने दिले सणसणीत उत्तर; तरीही चर्चांना उधाण

रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत विविध अफवा सातत्याने पसरत आहेत. दरम्यान, बीसीसीआयने स्वतः पुढे येऊन या अफवांचे खंडन केले आहे. हा रोहित शर्माचा शेवटचा सामना नाही असं स्पष्ट सांगितले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 18, 2026 | 11:29 AM
रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत BCCI ने केले खंडन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत BCCI ने केले खंडन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • खरंच रोहित शर्मा घेणार का निवृत्ती?
  • BCCI च्या सचिवांनी केले अफवांचे खंडन 
  • रोहित शर्मा इतक्यात निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले 
गेले दोन दिवस लॉर्ड्सच्या मैदानावर १९ जुलै रोजी रोहित शर्मा शेवटचा सामना खेळणार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणार अशा बातम्या पसरल्या होत्या. मात्र आता बीसीसीआयने शुक्रवारी रोहित शर्माच्या भविष्याबद्दलच्या चर्चा फेटाळून लावल्या आणि सांगितले की, रविवारी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना हा त्याचा शेवटचा सामना नाही. BCCI चे सचिव देबजित सैकिया यांनी PTI ला सांगितले की, रविवारी लॉर्ड्सवर रोहित आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळेल अशी कोणतीही चर्चा नाही.

रोहितबाबत बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे. सचिव देबजित सैकिया यांनी पीटीआयला सांगितले की, “माध्यमांमध्ये रोहित शर्माच्या भविष्याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. मला यावर जोर द्यायचा आहे की, रविवारी लॉर्ड्सवर रोहित आपला शेवटचा सामना खेळेल अशी कोणतीही चर्चा अजिबात नाही.”

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्ती घेणार? आई-वडील लंडनमध्ये, Lord’s वर खेळणार Hitman शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना

रोहित देशासाठी खेळत राहील

यानंतर ते पुढे म्हणाले की, “रोहित भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे आणि जोपर्यंत तो संघाच्या योजनांचा भाग आहे, तोपर्यंत तो देशासाठी खेळत राहील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना हा त्याचा शेवटचा सामना नाही.” लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल अशी अटकळ बांधली जात आहे, कारण राष्ट्रीय निवड समितीने त्याला कळवले आहे की २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या संघात त्याचा समावेश नाही.

यामुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे की, रविवारच्या सामन्यानंतर तो निवृत्तीची घोषणा करू शकतो किंवा त्याला संघातून वगळले जाऊ शकते. त्याने यापूर्वीच कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे.

लॉर्ड्सवर Rohit Sharma चा शेवटचा सामना? निवृत्तीच्या चर्चांवर प्रशिक्षकांचे स्पष्ट उत्तर

रोहितची कामगिरी खराब 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या बॅटने चांगली कामगिरी केली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित ११ धावांवर बाद झाला. दुसऱ्या सामन्यात त्याने ४७ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. यामुळे रोहितची कारकीर्द संपुष्टात येत असल्याची अटकळ बांधली जात आहे. तथापि, बीसीसीआय सचिवांच्या या वक्तव्यामुळे आता गोष्टी अधिक स्पष्ट झाल्या आहेत. दरम्यान रोहितच्या खेळावर इंग्लंडमधील या शेवटच्या सामन्यावर चाहत्यांचे आणि बीसीसीआयचेदेखील लक्ष राहील हे नक्की. बीसीसीआयने स्पष्ट करूनही अजूनही रोहितच्या निवृत्तीबाबत अटकळ थांबल्या नाहीत. सोशल मीडियावर याबाबत सतत चर्चा चालू आहे. मात्र आता येणारा काळच हे ठरवेल! 

Web Title: Bcci secretary devajit saikia gave response on rohit sharma retirement on lords from odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • bcci
  • ENG vs IND
  • IND Vs ENG
  • India vs England
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
1

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
2

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
3

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
4

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.