दिग्वेश सिंग राठी आणि प्रियांश आर्य(फोटो-सोशल मीडिया)
LSG Vs PBKS : आयपीएलच्या 13व्या मॅचमध्ये काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने आले होते. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा पराभव केला आहे. लखनऊने दिलेले 172 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने केवळ 16.2 ओव्हरमध्येच पूर्ण केले. या सामन्यात लक्षाचा पाठलाग करताना पंजाबचा सालामीवीर प्रभसिमरन सिंगने वेगवान खेळी करत 34 चेंडूत 69 धावां केल्या. या सामन्यादरम्यान लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू दिग्वेश सिंग राठीने प्रियांश आर्यला बाद केले. त्यानंतर राठीने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. हे सेलिब्रेशन आच्या अंगलट आले आहे. या सेलिब्रेशनसाठी बीसीसीआयकडून दिग्वेशला 25 टक्के दंड ठोठावण्यात आला.
एकना स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामाना रंगला होता. या सामन्यात पंजाबने एलएसजीचा पराभव केला. तसेच या सामन्यादरम्यान दिग्वेश राठीने आयपीएलची आचारसंहिता मोडल्याबद्दल बीसीसीआयने त्याला दंड ठोठावला आहे. आयपीएलच्या एका सामन्यात पंजाब किंग्जचा फलंदाज प्रियांश आर्यला बाद केल्याबद्दल दिग्वेशसिंग राठीला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के आणि एक डिमेरिट पॉईंट ‘पत्र लिहिण्याच्या मुद्रा’मध्ये साजरा केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
आयपीएल मीडिया पत्रात म्हटले आहे की, दिग्वेश सिंग कलम 2.5 अंतर्गत लेव्हल वन गुन्ह्यासाठी दोषी आढळून आला आहे. मॅच रेफरीने दिलेली शिक्षा त्याने मान्य केली आहे. लेव्हल वन गुन्ह्यात मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर प्रियांशला बाद केल्यानंतर त्याने हा वादग्रस्त आनंदोत्सव साजरा केला होता. त्याची शिक्षा त्याला देण्यात आली आहे.
🚨 DIGVESH RATHI FINED 25% OF HIS MATCH FEES AND HANDED 1 DEMERIT POINT FOR CELEBRATING. 🚨 pic.twitter.com/ofmJlsedmM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 2, 2025
जेव्हा प्रियांश तंबूत परतत होता, तेव्हा त्याचा दिल्ली T20 लीगचा सहकारी दिग्वेश त्याच्या जवळ गेला आणि त्याला हाताने एक पत्र लिहायला सांगितले, हे सर्व व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यावर पंचांनी त्याच्याशी चर्चाविमर्ष केला. त्याची तुलना वेस्ट इंडिजच्या केसरिक विल्यम्सशी देखील करण्यात आली. जो विरोधी फलंदाजाला बाद केल्यानंतर ‘नोटाबंदी’ साजरा करत असायचा. दिग्वेशच्या या कृतीवर महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि मोहम्मद कैफ यांनी देखील टीका केली आहे.
पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करायला लखनौला पाचरण केले. लखनौ संघ 20 षटकांत केवळ 171 धावाच करू शकला. ज्यामध्ये मार्करामने 28, पूरणने 44 धावा, पंतने 2 धावा, आयुष बडोनीने 41 धावा, डेव्हिड मिलरने 19 धावा आणि अब्दुल समदने 27 धावा केल्याअ आहेत. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने 3, लॉकी फर्ग्युसनन, मॅक्सवेलन, मार्को यानसेन आणि चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
प्रतिउत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने 16.2 षटकांतच विजय संपादन केला. प्रियांश आर्य 8 धावा करून लवकर बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांच्या भागीदारीने विजय सोपा केला. प्रभसिमरन सिंग 34 चेंडूत 69 धावांची खेळी खेळून महत्वाची भूमिका बजावली. या हंगामातील सलग दूसरा विजय ठरला तर एलएसजीचा लागोपाठ 2 रा पराभव ठरला आहे.