LSG Vs PBKS : प्रभसिमरन सिंगची तुफानी खेळी, पण चर्चा बाद होण्याची, बाऊंड्रीवर कॅचचा थरारार, दोन खेळाडू अन्..(फोटो-सोशल मीडिया)
LSG Vs PBKS : आयपीएल 2025 चा हा 18 वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा पराभव केला आहे. या विजयाने पंजाबने या हंगामात सलग आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे लखनऊचा मात्र दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लखनऊने दिलेले 172 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने केवळ 16.2 ओव्हरमध्येच पूर्ण केले. या सामन्यात लक्षाचा पाठलाग करताना पंजाबचा सालामीवीर प्रभसिमरन सिंगने तूफान फटकेबाजी करत 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या दरम्यान चर्चा झाली ती प्रभसिमरन सिंग झेलबाद झाला त्या अफलातून झेलची. याचा एक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्जने त्यांच्या चमकदार कामगिरीने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधले आहे. आयपीएल 2025 मध्ये पंजाबने चांगली कामगिरी केली आहे. .या संघाने आतापर्यंत खेळले गेलेले दोन्हीही सामने जिंकले आहेत. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्यांनी यजमान लखनौ सुपर जायंट्सचा दणदणीत पराभव केला. ज्यामध्ये प्रभसिमरन सिंगच्या स्फोटक खेळीने मोठी भूमिका बजावली. पण त्याची विकेट मात्र एक जबरदस्त चर्चेचा विषय ठरली.
प्रभासिमरन सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो कालच्या सामन्यात बिनधास्त खेळताना दिसून आला. त्याने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बाजवाळी. तो ज्या अनोख्या पद्धतीने बाद झाला तो क्षण मात्र अविस्मिरणीय ठरला. 11 व्या षटकाचा पहिला चेंडू दिग्वेश राठीने टाकला, त्याने स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. त्या शॉटमध्ये मोठी ताकद होती. परंतु चेंडू पूर्णपणे बॅटच्या मध्यभागी बसला नाही, ज्यामुळे तो खूप उंच न जाता मिड-विकेटच्या दिशेने गेला.
Superb. Smart. Special 🤝
A brilliant tag-team effort from Ayush Badoni & Ravi Bishnoi helped #LSG get the crucial wicket of Prabhsimran Singh! 👏#TATAIPL | #LSGvPBKS | @LucknowIPL pic.twitter.com/PxXxEwvX5G
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2025
तेव्हा मिड-विकेटवर उभ्या असलेल्या आयुष बडोनीने चेंडू हवेतच उडी घेऊन झेलला, पण तो सीमारेषेच्या अगदी जवळ असल्याचे लक्षात येताच त्याने प्रसंगावधान साधून चेंडू पुन्हा मैदनावर हवेत फेकला. चेंडू जवळपास जमिनीवर पडणारच तितक्यात जवळच उभ्या असलेल्या रवी बिश्नोईने चपळाई दाखवत हवेत सुर मारत झेल पूर्ण केला. अशाप्रकारे दोन्ही खेळाडूंमधील उत्कृष्ट समन्वय साधत घातक ठरणाऱ्या प्रभासिमरनला तंबूचा रस्ता दाखवला.
पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंहने एलेसजीने दिलेल्या 172च्या लक्ष्याचा पाठलाग करताना 69 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 9 चौकार लागवले. यानंतर नेहल वढेराने 25 चेंडूत नाबाद 43 आणि कर्णधार श्रेयस अय्यर 30 चेंडूत नाबाद 52 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. प्रभसिमरन सिंह आणि कर्णधार श्रेयश अय्यरच्या खेळीने पंजाबने लखनौचे 176 धावांचे लक्ष्य अवघ्या 16.2 षटकांतच पूर्ण केले. पंजाब किंग्सने स्पर्धेत दुसरा विजय संपादन करून गुणतालिकेत दुसरे स्थानही पटकावले.