करुण नायर(फोटो-सोशल मीडिया)
Duleep Trophy 2025 : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतील शेवटच्या आणि पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा ६ धावांनी पराभव केला. या संपूर्ण मालिकेत भर्तरीय संघाने दमदार कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध ८ वर्षानंतर भारतीय संघात स्थान देण्यात आलेल्या करूण नायरला मात्र साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने ८ डावांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावले. त्याच्या या कामगिरिचा फटका त्याला देशातर्गत खेळण्यात येणाऱ्या स्पर्धांसाठी बसला आहे. निवड समितीने दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेत सेंट्रल झोन संघातून करुण नायरला डच्चू दिला आहे. या संघाचे कर्णधारपद भारताचा युवा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलकडे देण्यात आले आहे.
ध्रुव जुरेल याला दुलीप ट्रॉफी २०२५-२०२६ स्पर्धेसाठी सेंट्रल झोन संघाचं कर्णधार असणारा आहे. ध्रुव १५ सदस्यीय संघाचू धुरा सांभाळणार आहे. जुरेल इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी सामन्यात संघाचा भाग होता. ऋषभ पंतला झालेल्या दुखापतीमुळे तो ओव्हल कसोटीमध्ये खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी ध्रुव जुरेला संघात स्थान देण्यात आले होते. सेंट्रल झोन संघात आयपीएलच्या १८ व्य हंगामातील विजेत्या आरसीबी संघाचा कर्णधार रजत पाटीदार आणि कुलदीप यादव या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र रजतला फिटनेस टेस्टमधून जावे लागणार आहे. रजत जर या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला त्याला या स्पर्धेत खेळता येणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : रविचंद्रन अश्विनचा CSK ला रामराम? IPL 2025 पूर्वी सोडणार संघ; फ्रँचायझीकडे व्यक्त केली ‘ही’ मागणी..
ध्रुव जुरेलला त्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीच्या आधारावर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ध्रुव गेल्या हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. इंडिया ए टीमच्या इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव आणि नेतृत्वगुण या जोरावर ध्रुवची सेंट्रल झोनच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवड समितीकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या करुण नायरला मोठा धक्का देण्यात आला आहे. करुण नायरला दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी सेंट्रल झोन संघात संधी देण्यात आलेली नाही. करुण नायरने विदर्भासाठी मागील हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेत एकूण ८६३ धावा फटकावल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील करुण नायरकडे कानाडोळा करण्यात आला आहे.
निवड समितीने सेंट्रल झोनच्या १५ सदस्यीय संघात योग्य असे संतुलन साधले आहे. आर्यन जुयाल, दानिश मालेवार आणि संचित देसाई या त्रिकुटावर फलंदाजीची धुरा असणार आहे. तर दीपक चाहर आणि खलील अहमद या दोघांच्या खाद्यांवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.
दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी सेंट्रल झोन टीम :
ध्रुव जुरेल (कर्णधार आणि विकेटकीपर), रजत पाटीदार (फिटनेसवर अवलंबून), दानिश मालेवार, आर्यन जुयाल, संचित देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, सरांश जैन, दीपक चाहर, आयुष पांडे, हर्ष दुबे, शुभम शर्मा, यश राठोड, मानव सुथार आणि खलील अहमद.
राखीव खेळाडू खालीलप्रमाणे :
कौशिक, यश ठाकुर, युवराज चौधरी, महिपाल लोमरोर, कुलदीप सेन आणि उपेंद्र यादव.