सौजन्य - ESPNcricinfo England Cricket बेनचे चौथे दमदार शतक! सर्वात वेगवान 2000 धावांचा विक्रम; इंग्लंडच्या फलंदाजीसमोर पाकिस्तान हतबल
Pakistan vs England 2nd Test : पहिल्या कसोटीत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या 366 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने बुधवारी झटपट धावा केल्या आणि यजमान संघावर दबाव आणला. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करीत शतक झळकावले. त्याचे हे चौथे कसोटी शतक आहे. या डावात डकेटने कसोटी कारकिर्दीतील 2000 धावाही पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा हा विक्रम आहे. त्याने सर्वात कमी चेंडूत 2000 कसोटी धावा केल्या आहेत.
बेन डकेटचे दमदार शतक, वेगवान 2000 धावांचा विक्रम
💯 YES DUCKY! 💯 A fluent knock brings Ben Duckett his fourth Test century ❤️ pic.twitter.com/2E9cLHET5g — England Cricket (@englandcricket) October 16, 2024
दुसरा कसोटी सामना मुलतान येथे खेळला
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे खेळला जात आहे. या सामन्यात कामरान गुलामच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने 366 धावा केल्या. बाबर आझमच्या जागी संघात आलेल्या कामरान गुलामने मंगळवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी 118 धावांची खेळी केली. सामन्याचा पहिला दिवस कामरान गुलामच्या नावावर होता तर दुसरा दिवस बेन डकेटच्या नावावर होता.
47 चेंडूत अर्धशतक ठोकले
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बेन डकेटने शतक झळकावून इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. डकेटने शतक पूर्ण केले तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 195 धावा होती. बेन डकेटने सुरुवातीपासूनच वेगवान फलंदाजी करत 47 धावांवर अर्धशतक केले. मात्र, त्याच्या प्रतिमेच्या विपरीत, त्याने डावातील दुसरे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी थोडा अधिक वेळ घेतला.
बेनने सर्वात संथ शतक झळकावले
बेन डकेटने 119 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे सर्वात संथ शतक आहे. बेन डकेटने भारताविरुद्ध 88 चेंडूत कसोटी शतक झळकावले आहे. याशिवाय त्याने पाकिस्तानविरुद्ध १०५ चेंडूत आणि आयर्लंडविरुद्ध १०६ चेंडूत शतके पूर्ण केली आहेत. शतक पूर्ण केल्यानंतर डकेट जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. तो 114 धावांवर साजिद खानच्या चेंडूवर आगा सलमानकरवी झेलबाद झाला.