फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय महिला संघासमोर आज ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचे आव्हान असणार आहे. टीम इंडियासाठी आज करो या मारो की स्थिती असणार आहे. भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेला पाहिला सामना गमावल्यामुळे भारताच्या संघाला आजचा सामना जिंकले अनिवार्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला या T२० विश्वचषकामध्ये कोणत्याही संघाने आतापर्यत पराभूत केले नाही. ऑस्ट्रेलिया महिला संघाने अजुनपर्यत एकही सामना गमावलेला नाही त्यामुळे भारतीय महिला संघाच्या कामगिरीवर आजचा निकाल पूर्णपणे निर्धारित असेल. भारताचा संघ आज हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली कशाप्रकारे कामगिरी करेल यावर क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य असणार आहे.
टीम इंडियाने त्याचा पहिला सामना गमावला होता तरीही अजुनपर्यत भारताच्या संघाच्या उपांत्य फेरीमध्ये जाण्याच्या आशा जिवंत आहेत. पण आजच्या सामान्यांचा निकाल भारतीय महिला संघासाठी फार महत्वाचा आहे. जर भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल आणि तेही इतर कोणत्याही संघावर अवलंबून न राहता, तर ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने पराभूत करणे हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. टीम इंडिया सध्या आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे तीन सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभव आणि ०.५७६ च्या निव्वळ धावगतीने चार गुण आहेत.
A blockbuster rematch of the #T20WorldCup 2023 semi-final and two European rivals facing off 👊
Day 11 preview 👉 https://t.co/NRYQDcMH1y pic.twitter.com/mky4WC6nzQ
— ICC (@ICC) October 13, 2024
ऑस्ट्रेलियाचे तीन सामन्यांत तीन विजयांसह सहा गुण आहेत. त्याचा नेट रन रेट २.७८६ आहे. जर भारताने ऑस्ट्रेलियाला ६१ धावांच्या फरकाने हरवले तर तो केवळ उपांत्य फेरीतच पोहोचणार नाही, तर त्याचा निव्वळ रनरेटही ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला असेल. त्याचबरोबर न्यूझीलंड देखील स्पर्धेमधून बाहेर होईल. न्यूझीलंडचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध आहे, या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा पाकिस्तानने पराभव केला तर संघ बाहेर होईल. पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ स्पर्धेमधून बाहेर झाले आहेत.