फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
आयपीएल २०२५ मेगा ऑक्शन : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये अनेक वाद पाहायला मिळाले होते. यामध्ये अनेक संघाच्या खेळांमध्ये बदल देखील पाहायला मिळाले. विशेषतः मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये मोठा बदल झाला तो म्हणजेच रोहित शर्मा कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या मुंबई इंडियन्सच्या निर्णयामुळे चाहत्यांची त्याचबरोबर माजी खेळाडूं देखील निराश झाले होते. आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन (IPL 2025 Mega Auction) होणार आहे. मेगा ऑक्शन दर तीन वर्षांनी होतो. मेगा ऑक्शनच्या नियमानुसार संघ फक्त त्यांच्या पूर्वीच्या चार खेळाडूंना कायम ठेवू शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मेगा लिलावात यावेळी मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ऑक्शनमध्ये खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघांचे पर्स मूल्य १०० कोटी रुपये होते, हे आता वाढण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार असे सांगितले आहे की, आयपीएल २०२५ च्या लिलावात संघाचे पर्स मूल्य १२० ते १४० कोटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अजुनपर्यत या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मेगा ऑक्शनमध्ये अनेक विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट राइडर्सने २४.७५ कोटी रुपयांना मिचेल स्टार्कला घेतले होते. या किमतीसह स्टार्क आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार पदावरून मोठ्या वादात आढळला. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये मोठा बदल पाहायला मिळेल असे भाकीत केले जात आहे. मेगा लिलावापूर्वी मुंबई रोहित शर्माला सोडणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. सूर्यकुमार यादवनेही मुंबई इंडियन्स सोडल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे आता मेगा ऑक्शनमध्ये कोणते नवे बदल पाहायला मिळणार आहेत याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.