कोची : २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १६ (IPL) व्या हंगामासाठी आज कोची येथे मिनी ऑक्शन रंगणार आहे. दुपारी २:३० वाजता या ऑक्शनला सुरुवात होणार असून यात आयपीएलचे संघ आपल्यात संघात शिल्लक राहिलेल्या खेळाडूंच्या जागा भरणार आहेत. आज होणाऱ्या ऑक्शननंतर संघांमध्ये महत्वाचे बदल होणार असून या ऑक्शनमध्ये बॉलिवूड स्टार्स देखील उपस्थीत राहण्याची शक्यता आहे. या स्टार्स मध्ये पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा, कोलकत्ता संघाचे मालक शाहरुख खान याची मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन इत्यादींचा समावेश असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा लिलाव टेबल नेहमी त्याच्या मालकांमुळे चर्चेत राहिला आहे. मागील वर्षी देखील शाहरुखची मुलं सुहाना खान, आर्यन खान आणि जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता त्यांच्या व्यवस्थापनासह संपूर्ण वेळ ऑक्शनमध्ये उपस्थित होती.
सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण असलेल्या काव्या मारनवर लिलावात कॅमेऱ्यांचे बरेच लक्ष आहे. काव्या सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नसली तरी आयपीएल सामने आणि ऑक्शन दरम्यानच दिसते. लोकांना त्याच्याबद्दल खूप रस आहे. काव्या यावेळीही कोचीला पोहोचली आहे.
पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा शेवटच्या आयपीएल ऑक्शनला आली नव्हती, परंतु यावेळी ती टेबलवर दिसू शकते. बॉलीवूड स्टार प्रीती अनेकदा लिलावात इतर संघांच्या व्यवस्थापनासोबत फ्लर्ट करते. मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी देखील चर्चेत असतात जी नेहमी आपल्या मुलांसोबत लिलावात उपस्थित असते.