चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक (फोटो सौजन्य - Instagram)
पाकिस्तान आणि युएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. या प्रतिष्ठित आयसीसी स्पर्धेची सुरुवात बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होईल. भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, तर उर्वरित सामने पाकिस्तानमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी – रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथे होतील.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी खेळला जाईल. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामना दुबईमध्ये होईल, अन्यथा हा सामना लाहोरमध्ये होईल. दुसरा उपांत्य सामना लाहोरमध्ये खेळला जाईल. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी दोन्हीमध्ये राखीव दिवस असतील.
असे असतील दोन गट
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी, सर्व आठ संघांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत, तर दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दिवस-रात्र असतील.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना कधी खेळला जाईल?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. पाकिस्तान स्वतः यावेळी यजमान असल्यामुळे सर्वांचे या सामान्याकडे लक्ष लागून राहिले आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या या सामन्यानंतर अंदाज वर्तविले जातील.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामने किती वाजता सुरू होतील?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होतील. सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी २:०० वाजता होईल आणि त्यानंतर अर्ध्या तासात या सामन्याचा आनंद प्रेक्षकांना लुटता येईल. तुम्ही लाईव्ह कुठे पाहू शकता? हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर याचेही उत्तर आमच्याकडे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याशिवाय, सामने Jio Hotstar वर लाईव्ह स्ट्रीम केले जातील.
चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रक: